आयपीएलच्या मैदानात रविवारी (21 मे) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमने सामने होते. हैदराबाद संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. मात्र मुंबईने हा सामना जिंकल्यानंतर त्यांच्या आशा कायम राहणार होत्या. या सामन्यादरम्यान क्रिकेट जगतातील दोन दिग्गज सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांचीही भेट झाली. दोगांमध्ये वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीविषयी चर्चा झाल्याचे समजते. लारांनी दिलेल्या माहितीनुसार ही खेळपट्टी पाहून सचिन आणि त्यांनी मैदानात पुनरागमन करण्याचा विचार केला.
मुंबईच्या वानखडे स्टेडियमची खेळपट्टी आयपीएल 2023मध्ये फलंदाजीसाठी अनुकूल राहिली आहे. अशात या सामन्यातील खेळपट्टीने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ब्रायन लारा (Brian Lara) यांचेही लक्ष्य वेधले. सचिन आणि लारा सध्या उतरत्या वयात असले, तरीही अशाप्रकारच्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात आजही आहे. सामन संपल्यानंतर वेस्ट इंडीजचे दिग्गज लारा माध्यमांशी चर्चा करत होते. यावेळी ते म्हणाले, “खेळपट्टी खूप सपाट आहे. मी सचिनसोबत चर्चा करत होतो. आम्ही विचार केला की, आम्हीही अशा खेळपट्टीवर पुनरागमन करू शकतो. आपण पाहिले आहे की, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम बहुतांश वेळा गोलंदाजीचा निर्णय घेत आहेत. कारण तुम्हाला माहिती नाहीये की, अशा खेळपट्ट्यांवर विरोधी संघ किती मोठी धावसंख्या करेल.”
लारांच्या मते सनरायझर्स हैदराबादला आधीच माहिती होते की, वानखडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत कऱणे सोपे नसेल. सामन्यात झाले देखील तसेच. मुंबईच्या फलंदाजांना हैदराबादचे गोलंदाज निर्धारित धावसंख्येवर रोखू शकले नाहीत. लारा म्हणाले, “आज त्यांनी (मुंबई इंडियन्य) आमच्याविरोद्ध मनसोक्त धावा केल्या. आम्हालाही माहिती होते की, या खेळपट्टीवर खूप धावा बनतील. त्यांनी याठिकाणी (वानखेडे) अनेकदा 200 धावा केल्या आहेत. आमचे खेळाडू गोलंदाजी करताना सामना नियंत्रणात ठेऊ शकले नाहीत.”
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा नाणेफेक जिंकून मुंबईने गोलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकांमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघ 5 बाद 200 धावा करू शकला. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ 18 षटकांमध्ये 201 धावा करून जिंकला. कॅमरून ग्रीन याचे शतक मुंबईच्या विजयासाठी महत्वाचे ठरले. (‘Looking at Wankhede’s pitch, I thought Sachin and I could make a comeback’ – Brian Lara)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023च्या पहिल्या क्वालिफायरसाठी चेन्नई-गुजरात सज्ज, एकाच क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती
‘आम्ही सलग दुसऱ्यांदा फायनल…’, RCBचे स्वप्न धुळीस मिळवल्यानंतर गिलचे पहिल्या क्वालिफायरबद्दल भाष्य