पुणे १४ जुलै – सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना येथे सुरु असलेल्या लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १२ आणि १४ वर्षांखालील गटात दणदणीत विजयाची नोंद केली.
लॉयला प्रशालेच्या पाषाण येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत १६ वर्षांखालील गटात सेंट व्हिन्सेंट संघाने कलमाडी प्रशालेचा ५-१ असा पराभव करून दिवसातील तीनही सामन्यात विजयी मालिका कायम राखली. त्यापूर्वी झालेल्या १२ वर्षांखालील गटातील सामन्यात सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघाने अंश लोढाच्या सहा गोलच्या जोरावर कलमाडी प्रशालेचा १३-० असा धुव्वा उडवला. अंशने ६, १६, १७, २०, २६ आणि ३४ मिनिटांना गोल केले. आयुष रचाबुटनीने (२रे, ४थे, ११वे मिनिट) तीन गोल करून त्याला सुरेख साथ केली. विहान शिंदेने (१९वे, ३९वे मिनिट) दोन गोल केले. अझलन लांडगे (२४वे मिनिट) आणि जोएल चेरियन (२८वे मिनिट) यांनी एकेक गोल केला.
सेंट व्हिन्सेंटने १४ वर्षांखालील गटातही कलमाडी प्रशालेचा १३-० अशाच गोलफरकाने पराभव केला. या वेळी नैतिक गुप्ताने १२, १८, १९, २२, ४१ आणि ४९ मिनिटाला असे सहा गोल केले. परम भार्गवने (७वे, ३५वे, ३७वे) तीन, तर लोबो, श्लोक मिठापेल्ली, जोनाब अंम्बट आणि इशान ठोकलेने एक गोल केला. अन्य सामन्यात कल्याणी स्कूलने १४ आणि १६ वर्षांखालील गटात सी.एम. इंटरनॅशनल प्रशाला संघाचा ६-१ अशा फरकाने पराभव केला. १२ वर्षांखालील गटातील या संघांदरम्यानचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
निकाल –
१२ वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट प्रशाला १३ (आयुष रचाबुट्टनी २, ४, ११वे मिनिट, अंश लोओढा ६, १६, १, २०, २६, ३४वे मिनिट, विहान शिंदे १९, ३९वे मिनिट, अझलन लांडगे २४वे, जोएल चेरियन २८वे मिनिट) वि.वि. कलमाडी प्रशाला ०
कल्याणी स्कूल ० बरोबरी वि. सी.एम. इंटरनॅशनल स्कूल ०
१४ वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट प्रशाला १३ (नैतिक गुप्ता १२, १८, १९, २२, ४१, ४९वे मिनिट, परम भार्गव ७, ३५, ३७वे मिनिट, एथन लोबो १५वे, श्लोक मिठापेल्ली २५वे, जोनाह अम्बाट ४५वे मिनिट, इशान ठोकळे ४८वे मिनिट)
कल्याणी स्कूल ६ (अध्यांत अहुजा ७वे मिनिट, अथर्व सातव २५वे मिनिट, गुहान मोटवानी २८, ३१वे, ४०वे मिनिट, हर्षिल शाह ३५वे, वेदांग बेरी ३७वे, परवार मलिक ५०वे मिनिट) वि.वि. सी.एम. इंटरनॅशनल स्कील १ (रियाझ जांगीड)
१६ वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट ५ (विराज चक्रनारायणन १३, २१वे मिनिट, आर्यन नायर २५वे मिनिट, नील सेनगुप्ता ४९वे मिनिट, आर्यन सुर्यवंशी ६०वे मिनिट) वि.वि. कलमाडी प्रशाला १ (तनिश आयाचित २७वे मिनिट)
कल्यामी स्कूल ६ (शौर्य आनंद १२, २२वे मिनिट, आदित्य लखोटिया २५, २९वे मिनिट, रचित शर्मा ५८वे मिनिट, अध्यान भार्गव ६०वे मिनिट) वि.वि. सी.एम. इंटरनॅशनल १ (चैतन्य परांडेकर ३रे मिनिट) (Loyal Football. A resounding win for St. Vincent Prashala)
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण विभाग दुलीप ट्रॉफी विजयाच्या दिशेने! कवीरप्पाच्या 7 बळींनी मोडले पश्चिम विभागाचे कंबरडे
BREAKING । भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा! डिसेंबर-जानेवारीत तीन मालिकांचे आयोजन