पुणे २१ जुलै २०२३ – टाटा ऑटोकॉम्प पुरस्कृत आंतरशालेय लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत आज शहरात बरसणाऱ्या संततधार पावसाबरोबर मैदानातही गोलांचा पाऊस पडला. बिशप्स आणि लॉयला प्रशाला संघांनी निर्विवाद वर्चस्व राखताना सहा सामन्यात मिळून ४६ गोल केले. यात ३६ गोल एकट्या बिशप्स प्रशालेने नोंदवले.
लॉयला प्रशालेने विद्याभवन प्रशालेविरुद्ध १२ वर्षांखालील गटात ४-०, १४ वर्षांखालील गटात ३-० आणि १६ वर्षांखालील गटात १-० असा विजय मिळविला. लॉयलाच्या १२ वर्षांखालील गटात अनुराग पारसनीसने दोन, आरव वागळे, शॉन आंग्रेने प्रत्येकी एक गोल केला. १४ वर्षांखालील गटात अन्य दम्बाल, पार्थ शिंदे आणि परम कुलकर्णीने एकेक गोल केला. १६ वर्षांखालील गटात एकमात्र गोल लव्या अशराणीने केला.
दुपारच्या सत्रात लॉयला प्रशालेच्या मैदानावर गोलांचा पाऊस पडला. शिखर शहाच्या (११, १३, १६, १९, २१, २८, ३०वे मिनिट) सात गोलच्या जोरावर बिशप्स प्रशाला संघाने १४ वर्षांखालील गटात सेंट पेट्रिक्स प्रशालेचा १५-० असा पराभव केला. अर्जून देशपांडेने चार, दिव्यान कौशिकने तीन आणि क्रिस मेण्डोकाने एक गोल करून संघाच्या गोलाधिक्यात भर घातली.
बिशप्सने १६ वर्षांखालील गटात सेंट पेट्रिक्स प्रशालेचाच ७-० असा पराभव केला. श्रावण कुडके, राज पाटिल, हल्लम हार्ट, आथर्व फडतरे, आरिझ शेख यांनी एकेक, तर आरव सिधवानीने दोन गोल केले. दिवसातल्या अखेरच्या सामन्यात १२ वर्षांखालील गहटात बिशप्स प्रशाला संघङाने सेंट पेंट्रिक्सवर १४-० असा विजय मिळविला. यामध्ये ध्रुव चुगानीने पाच, तर ध्रुव बाडकरने तीन गोल केले. अबीर जाधव, झिदान अक्कलकोटकरने दोन, हितांश खत्री, अर्सलान शेखने एकेक गोल केला.
निकाल –
१२ वर्षांखालील – लॉयला प्रशाला ४ (आरव वागळे ५वे मिनिट, अनुराग पारसनीस ६, १४वे मिनिट, शॉन आंग्रे ३४वे मिनिट) वि.वि. विद्याभवन प्रशाला ०
बिशप्स प्रशाला कॅम्प, १४ (ध्रुव चुगानी २, ५, ८, ९, ११वे मिनिट, हितांश खत्री १३वे मिनिट, झिदान अक्कलकोटकर १५, २८वे मिनिट, अबीर जाधव १६, ४०वे मिनिट, ध्रुव बाडकर २३, ३३, ३९वे मिनिट, अर्सलन शेख ३८वे मिनिट) वि.वि. सेंट पेट्रिक्स प्रशाला ०
१४ वर्षांखालील – लॉयला प्रशाला ३ (अन्वय दम्बल ३रे मिनिट, पार्थ शिंदे ३१वे मिनिट, परम कुलकर्णी ४१वे मिनिट) वि.वि. विद्याभवन प्रशाला ०
बिशप्स प्रशाला, कॅम्प १५ (अर्जुन देशपांडे १, ८, २७, ३६वे मिनिट, शिखर शहा ११, १३, १६, १९, २१, २८, ३०वे मिनिट, दिव्यन कौशिक २४, २५, ३५वे मिनिट, क्रिस मेंण्डोका ३४वे मिनिट) वि.वि. सेंट पेट्रिक्स प्रशाला ०
१६ वर्षांखालील – लॉयला प्रशाला १ (लव्या अशराणी ३४वे मिनिट) वि.वि. विद्याभवन ०
१६ वर्षांखालील – बिशप्स प्रशाला, कॅम्प ७ (श्रावण कु़डके ५वे मिनिट, राज पाटिल ६वे मिनिट, हल्लम हार्ट २९वे मिनिट, अथर्व फडतरे ३०वे मिनिट, आरिझ शेख ४८वे मिनिट, आरव सिधवानी ५०, ६०वे मिनिट)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: त्रिनिदादमध्ये विराट पर्व! झळकावले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 76 वे शतक
बॅडलक! बेअरस्टोला शतकासाठी एक धाव हवी असताना गेली शेवटची विकेट, इंग्लंडची भलीमोठी आघाडी