पुणे १७ जुलै २०२३ – बिशप्स प्रशाला, कॅम्प आणि लॉयला प्रशाला संघांनी एकतर्फी वर्चस्व राखत लॉयला कप आंतरशालेय टाटा ऑटोकॉम्प फुटबॉल स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.
लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेत सोमवारी चौथ्या दिवशी १४ वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने एसएसपीएमएस बोर्डिंग प्रशाला संघाचा १३-० असा धुव्वा उडवला. पार्थ शिंदेने (२२, २५, ३३ आणि ३५वे मिनिट) चार गोल करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. करांशु गजरे (२, ११, १७वे मिनिट) आणि परम कुलकर्णी (८, १४, २१वे मिनिट) प्रत्येकी तीन गोल करून त्याला सुरेख साथ केली. अधिकाज सिंगने दोन, तर वेदांत शितोळेने एक गोल केला.
लॉयला प्रशाला संघाने त्यानंतर १६ वर्षांखालील गटात एसएसपीएमएस बोर्डिंग प्रशाला संघाचा १०-३ असा पराभव केला. वेदांत कांबळे (१४, ३४, ४३वे मिनिट) आणि वेदांत गुप्ताने (२१, ४७, ५५वे मिनिट) प्रत्येकी तीन गोल केले. अथर्व सोनावणेने दोन आणि दर्श कासट आणि शुभम चौधरीने एकेक गोल करून त्यांना सुरेख साथ केली. पराभूत संघाकडून श्रीनिवास महालेने दोन, तर हर्ष गवळीने एक गोल केला. स्पर्धेतील १२ वर्षांखालील गटात शॉन आंग्रेने १५व्या मिनिटाला नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या आधारावर लॉयला प्रशालेने एसएसपीएमएस प्रशाला संघाचा १-० असा पराभव केला.
बिशप्स प्रशाला संघाने १४ वर्षांखालील गटात विद्या व्हॅली संघावरील ११-० विजयाने आपल्या मोहिमेस सुरुवात केली. अर्जुन देशपांडे (१,२, २८वे मिनिट) आणि शिखर शहा (३, २१२, २३वे मिनिट) यांनी प्रत्येकी तीन गोल केले. त्यांना जोसुहा सोंगाटे, झैद बेग, आर्यन किर्तने, सामुईत कासट आणि दिउयान कौशिक यांनी एकेक गोल करून सुरेख साथ केली. स्पर्धेतील १६ आणि १२ वर्षांखालील गटात बिशप्स प्रशाला संघाने विद्या व्हॅली संघावर ३-० अशाच सारख्या फरकाने विजय मिळविला. (Loyola Cup Football. Loyola advances with resounding win)
निकाल –
१२ वर्षांखलाली गट – बिशप्स प्रशाला, कॅम्प ३ (अभीर जाधव १२वे मिनिट, झिसान अक्कलकोटकर २४वे मिनिट, हितांश खत्री २७वे मिनिट) वि.वि. विद्या व्हॅली प्रशाला ०
लॉयला प्रशाला १ (शॉन आंग्रे १५वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डिंग ०
१४ वर्षांखालील – बिशप्स प्रशाला कॅम्प ११ (अर्जुन देशपांडे १ले, २रे, २८वे मिनिट, शिखर शहा ३रे, २१वे, २३वे मिनिट, जोशुहा सोंगाटे ६वे, झैद बेग १०वे, आर्यन किर्तने ११वे, सामुइत कासट १२वे, दिउयान कौशिक १५वे मिनिट) वि.वि. विद्या व्हॅली प्रशाला ०
लॉयला प्रशाला १३ (खरांशु गरजे २, ११, १७वे मिनिट, परम कुलकर्णी ८, १४, २१वे मिनिट, वेदांत शितोळे १६वे, पार्थ शिंदे २२, २५, ३३, ३५वे मिनिट, अधिराज सिंग ३६, ३९वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डिग ०
१६ वर्षांखालील – बिशप्स प्रशाला ३ (आरिझ शेख ३७वे , ६०वे मिनिट, इक्बाल शेख ४५वे मिनिट) वि.वि. विद्या व्हॅली प्रशाला ०
लॉयला प्रशाला १० (अथर्व सोनावणे ३, ३२वे मिनिट, वेदांत कांबळे १४, ३४, ४३वे मिनिट, वेदांत गुप्चता २१ ४७वे, ५५वे मिनिट, दर्श कासट ४०वे, शुभम चौधरी ५८वे मिनिट) वि.वि. एसएसपीएमएस बोर्डिंग ३ (श्रीनिवास महाले ३०, ६०वे मनिट, हर्ष गवळी ३०+१वे मिनिट)
महत्वाच्या बातम्या –
“त्याने पाणीपुरी विकलीच नाही”, यशस्वीच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा, म्हणाले, “तो माझ्यामूळे…”
देशासाठी तीन विश्वचषक जिंकणाऱ्या धोनीवर माजी कर्णधाराचा निशाणा; म्हणाले, ‘कर्णधार तोच राहणार…’