‘कॅच विन्स द मॅच’ क्रिकेटमध्ये ही संज्ञा वारंवार ऐकायला मिळते. एक अचूक टिपलेला झेल किंवा हातून सुटलेला झेल सामन्याची रुपरेषा बदलू शकतो. युवा भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल २०२२ मधील चौथ्या सामन्यात याचा प्रत्यय दिला आहे. गुजरात जायंट्सचे प्रतिनिधित्त्व करताना शुबमनने पावरप्लेमध्ये लखनऊच्या फलंदाजाचा जबरदस्त झेल टिपला आहे.
त्याचे झाले असे की, गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. त्याचा निर्णय योग्य ठरवत गुजरातच्या गोलंदाजांनी पावरप्लेमध्ये ४ विकेट्स काढल्या. यातील एक विकेट घेण्यात शुबमनचा (Shubman Gill) मोठा हात होता. वरूण ऍरॉनच्या चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लखनऊच्या एविन लुईसने (Evin Lewis) शॉर्ट आऊटसाईड ऑफच्या दिशेने हवेत बॅट फिरवली आणि चेंडू हवेतून भिरकावत मिड विकेटकडे गेला.
यावेळी मिड विकेटवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या शुबमनने मागच्या दिशेने धाव घेत हवेत सूर मारत झेल (Shubman Gill Stunning Catch) टिपला. त्याच्या प्रयत्नांमुळे लुईस केवळ १० धावांवर पव्हेलियनला परतला. दुसरीकडे शुबमनच्या या जबरदस्त झेलने सर्वांना महान भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या १९८३ विश्वचषकातील अविस्मरणीय झेलची आठवण करून दिली, जो त्यांनी अंतिम सामन्यात घेतला होता.
शुबमनच्या या झेलचे क्रिकेटप्रेमींकडून कौतुक होत आहे. अनेकांनी त्याच्या झेलचा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. गुजरात संघानेही त्याचा झेल घेतानाचा फोटो पोस्ट करत ‘हा पतंग आहे? की हेलिकॉप्टर?, नाही हा तर शुबमन गिल आहे!’, असे भन्नाट कॅप्शन दिले आहे.
Is it a 🪁? Is it a ✈️? No! It's Shubman Gill!#TitansFAM, 𝙩𝙖𝙢𝙚 𝙟𝙤𝙮𝙪 𝙠𝙚?#SeasonOfFirsts #AavaDe #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/BoAePJxqJL
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 28, 2022
😱 What a Catch @ShubmanGill 👏👏👏👏👏👏👏 #IPL2022 ❤ pic.twitter.com/EqWe25heTW
— 🦋 Sathya🎱🧚♀💛 (@Sathyaaaa8) March 28, 2022
https://twitter.com/ceoofgilledits/status/1508452465523396612?s=20&t=DULoFYtDrGlFVzi7nEqJnA
पावरप्लेमध्ये शमीच्या गोलंदाजीचा जलवा
दरम्यान गुजरातकडून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) पावरप्लेमध्ये धुमाकूळ घातला. त्याने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर लखनऊचा कर्णधार राहुलला शून्यावर झेलबाद केले. त्यानंतर ७ धावांवर खेळत असलेला क्विंटन डी कॉक त्याची शिकार ठरला. त्याने तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डी कॉकला त्रिळफाचीत केले. तर ४.३ षटकात मनिष पांडेला ६ धावांवर त्रिफळाचीत करत पावरप्लेची समाप्ती केली. शमीने आयपीएल सामन्यात पावरप्लेमध्ये ३ विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ होती.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये इतक्या फ्रँचायझी, त्यांचे इतके बॉलर… पण शमीने गुजरातसाठी जे केले ते ऐतिहासिकच
ब्रेंडन मॅक्यूलम आणि केएल राहुल; दोघांच्याही नावावर मरेपर्यंत न विसरवता येणारा IPLचा ‘नकोसा विक्रम’
व्हॉट अ स्टार्ट! शमीने सर्वांच्याच उंचावल्या भुवया, पहिल्याच चेंडूवर लखनऊचा कर्णधार ‘गोल्डन डक’