इंडियन सुपर लीग २०२२मध्ये सोमवारी (२८ मार्च) चौथ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात आयपीएल पदार्पण करणाऱ्या लखनऊच्या दीपक हुड्डाने विस्फोटक खेळी केली. आपल्या संघाच्या पहिल्याच सामन्यात त्याने तुफान अर्धशतकी खेळी केली आणि आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढले. या अर्धशतकासह त्याने इतिहास रचला आहे.
दीपक हुड्डाने (Deepak Hooda) ४१ चेंडूंचा सामना करताना ५५ धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ६ चौकार ठोकले. या अर्धशतकासह तो लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाकडून आयपीएलच्या पहिल्याच हंगामात अर्धशतक ठोकणारा पहिला खेळाडू बनला. यामुळे आता लखनऊ संघाकडून पहिल्या हंगामातील पहिल्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा फलंदाज म्हणून इतिहासात दीपक हुड्डाची नोंद घेतली जाईल.
FIFTY for Hooda 👏👏
His 4th 50 in #TATAIPL
Live – https://t.co/u8Y0KpnOQi #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/768Rn1AfGa
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
दीपक हुड्डासोबत आयुष बदोनीचेही अर्धशतकी योगदान
आयपीएल २०२२मध्ये लखनऊ संघाकडून पदार्पण करणाऱ्या आयुष बदोनीने ४१ चेंडूंचा सामना करताना ५४ धावा केल्या. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ४ चौकारांचा पाऊस पाडला. हुड्डापाठोपाठ आयुष लखनऊ संघाकडून पहिल्या हंगामातील पहिल्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा दुसरा फलंदाज बनला आहे.
लखनऊ संघाच्या डावाचा थोडक्यात आढावा
लखनऊ संघाच्या डावाबद्दल बोलायचं झालं, संघाचा कर्णधार केएल राहुल सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद होऊन तंबूत परतला. त्याच्यापाठोपाठ नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या. पावरप्लेमध्ये संघाची धावसंख्या ४ बाद २९ अशी होती. मात्र, दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीने दिलेली कडवी झुंज संघासाठी फायदेशीर ठरली. त्यांच्या अर्धशतकांच्या मदतीने लखनऊ संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५८ धावा केल्या. यावेळी गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त वरुण ऍरॉनने २, तर राशिद खानने १ विकेट आपल्या खिशात घातली.
दीपक हुड्डाची कामगिरी
दीपक हुड्डाच्या आयपीएल कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ८१ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६२ डावांमध्ये फलंदाजी करताना १७.५०च्या सरासरीने ८४० धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ अर्धशतकेही ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
नुसता कॅच नव्हे, शुबमन गिलने मॅच हातात घेतली? जबरदस्त ‘हवाई झेल’चा व्हिडिओ होतोय व्हायरल
व्हॉट अ स्टार्ट! शमीने सर्वांच्याच उंचावल्या भुवया, पहिल्याच चेंडूवर लखनऊचा कर्णधार ‘गोल्डन डक’
आयपीएलमध्ये इतक्या फ्रँचायझी, त्यांचे इतके बॉलर… पण शमीने गुजरातसाठी जे केले ते ऐतिहासिकच