१६ सप्टेंबर पासून एमए रंगूनवाला बॅडमिंटन लीग

पुणे। महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एमए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने १६ ते १९ सप्टेंबर २०१९ दरम्यान ‘एमए रंगूनवाला बॅडमिंटन लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .

१६ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता या स्पर्धेचे उदघाटन सुब्रमणियम शिवरामकृष्णन (व्हाईट शटल बॅडमिंटन एकेडमी चे संस्थापक )यांच्या हस्ते होणार आहे.

Related Posts

हॉटेल्स आणि हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण संस्थांचे १४ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत . ही स्पर्धा आझम कॅम्पस बॅडमिंटन कोर्ट (पुणे कॅम्प ) येथे होईल . स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे, स्पर्धा संयोजक प्रा व्हिन्सेंट केदारी यांनी ही माहिती दिली.

 

You might also like