fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मध्य प्रदेश एमेच्योर कबड्डी असोसिएशन कडून मध्यप्रदेश सीएम रिलीफ फंड साठी मदत..

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो भारतातही वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतात २५ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात थैमान घातलेल्या या व्हायरसला थांबविण्यासाठी क्रीडा जगतातून मोठ्या प्रमाणावर मदत केली जात आहे.

मध्य प्रदेश एमेच्योर कबड्डी असोसिएशन सदस्य कडून कोविड-१९ विरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधी (सीएम रिलीफ फंड) मध्ये मदत केली आहे. असोसिएशनच्या सदस्यांकडून १,१९,४६१ रुपये रक्कम जमा करून देण्यात आली.

कोरोनामुळे देशावर आर्थिक संकट आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. पण सध्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी अशाप्रकारे मदत करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला व राज्याला सहकार्य करावे.

You might also like