---Advertisement---

३८व्या राष्ट्रीय खेल स्पर्धेकरीता महाराष्ट्राचा बीच कबड्डी संघ जाहीर

---Advertisement---
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन
छत्रपती शिवाजी महाराज मैदान(शिवाजी पार्क),
दादर(प.), मुंबई – ४०००२८.
मुंबई:- उत्तराखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय खेल स्पर्धेत दिनांक ९ ते १३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या बीच कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. मुंबई शहरच्या पौर्णिमा जेधे कडे महिला, तर अहमदनगरच्या शंकर गदई कडे पुरुष संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. निवडण्यात आलेले हे दोन्ही संघ जिग्नेश मोरे व निलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात प्रभादेवी येथील चौपाटीवर जोरात सराव करीत आहे. निवडण्यात आलेला हा संघ दिनांक ७ फेब्रु. रोजी दुपारी ०२-५० च्या विमानाने स्पर्धेकरीता उत्तराखंडला प्रयाण करेल. अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना दिली. निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.
महिला संघ :- १)पौर्णिमा जेधे(संघनायिका)- मुंबई शहर, २) याशिक पुजारी – मुंबई उपनगर, ३)सिद्धी चाळके – रत्नागिरी, ४)रचना म्हात्रे – रायगड, ५)अंकिता चव्हाण – पुणे, ६)प्राजक्ता पुजारी – ठाणे.
प्रशिक्षक :- जिग्नेश मोरे.          व्यवस्थापिका :- दर्शना सणस.
पुरुष संघ :- १)शंकर गदई (संघनायक) – अहमदनगर, २)चिन्मय गुरव – ठाणे, ३)साहिल राणे – मुंबई शहर, ४)हर्ष माने – पिंपरी चिंचवड, ५)आकाश रुडले – मुंबई उपनगर, ६)आदित्य शिंदे – अहमदनगर.
प्रशिक्षक :- निलेश शिंदे.          व्यवस्थापक:- दिनेश घावडे.shi

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---