Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ, डेक्कन चार्जर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ, डेक्कन चार्जर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

February 26, 2022
in टेनिस
Kamlesh-ShahBlack-and-Vikas-BachlooSkyblue

Photo Courtesy: File Photo


पुणे। फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी तर्फे आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र मंडळ व डेक्कन चार्जर्स या संघांनी अनुक्रमे डेक्कन ग्लॅडिएटर्स व एफसी जीएनआर या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या लढतीत पहिल्या सामन्यात महाराष्ट्र मंडळ संघाने डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाचा 18-16 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सामन्यात 100अधिक गटात महाराष्ट्र मंडळच्या कमलेश शहा व विकास बचलू यांनी डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या विद्याधर हुमनाबादकर व आदित्य खटोड यांचा 6-5(7-5)असा तर, 90 अधिक गटात महाराष्ट्र मंडळ संघाच्या संजय सेठी व राजेंद्र देशमुख यांनी डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या जितेंद्र जोशी व केदार पाठक यांचा 6-4 असा पराभव करून भक्कम अशी आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात महाराष्ट्र मंडळच्या आकाश खैरे व अभिषेक चव्हाण डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या विशाल साळवी व प्रसनजीत पॉल या जोडीने 0-6 असे एकतर्फी पराभूत करून ही आघाडी कमी केली. पण दुसऱ्या खुल्या गटात महाराष्ट्र मंडळ संघाच्या धरणीधार मिश्राने महेश जाधवच्या साथीत डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या आदित्य खटोड व चिराग रूनवाल यांचा 6-1 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात डेक्कन चार्जर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत एफसी जीएनआर संघाचा 23-09 असा पराभव करून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. डेक्कन चार्जर्स संघाकडून आशिष पुंगलिया, जयदीप दाते, अमोद वाकलकर, अजित सैल, ऋषिकेश पाटसकर, रक्षय ठक्कर यांनी सुरेख कामगिरी केली.

निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
डेक्कन चार्जर्स वि.वि.एफसी जीएनआर 23-09(100अधिक गट: आशिष पुंगलिया/जयदीप दाते वि.वि.पंकज यादव/मनोज कुलकर्णी 6-0; 90 अधिक गट: अमोद वाकलकर/अजित सैल वि.वि.पुष्कर पेशवा/केदार राजपाठक 6-0; खुला गट: मुकुंद जोशी/आशिष पुंगलिया पराभूत वि. पंकज यादव/यश देशमुख 5-6(4-7); खुला गट: ऋषिकेश पाटसकर/रक्षय ठक्कर वि.वि.अनिश नवठे/शांभवी नाडकर्णी 6-3);

महाराष्ट्र मंडळ वि.वि.डेक्कन ग्लॅडिएटर्स 18-16(100अधिक गट: कमलेश शहा/विकास बचलू वि. वि.विद्याधर हुमनाबादकर/आदित्य खटोड 6-5(7-5); 90 अधिक गट: संजय सेठी/राजेंद्र देशमुख वि.वि.जितेंद्र जोशी/केदार पाठक 6-4; खुला गट: आकाश खैरे/अभिषेक चव्हाण पराभूत वि.विशाल साळवी/प्रसनजीत पॉल 0-6; खुला गट: धरणीधार मिश्रा/महेश जाधव वि.वि.आदित्य खटोड/चिराग रूनवाल 6-1).

महत्त्वाच्या बातम्या –

एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तविश पाहवा, आनंदिता उपाध्याय यांना दुहेरी मुकुटाची संधी

प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात पुरस्कार विजेत्यांवर पैशांचा पाऊस, पाहा कोणत्या खेळाडूंना मिळाले पुरस्कार

संपूर्ण यादी: प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात सर्वाधिक पाँइंट्स मिळवणारे टॉप ५ रेडर्स आणि डिफेंडर्स 


Next Post
Shahnawaz-Dahani-MS-Dhoni

'धोनीला भेटून माझे मोठे स्वप्न पूर्ण झाले', पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला टी२० विश्वचषकादरम्यानचा किस्सा

Sri-Lanka

पहिल्या टी२०तील पराभवानंतर श्रीलंकेला दुहेरी धक्का! 'हे' २ खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

Leander-Paes

लिएंडर पेसला तगडा झटका, एक्स लिव-इन पार्टनरने जिंकली कौटुंबिक हिंसेची केस; द्यावे लागणार इतके लाख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143