पुणे। फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी तर्फे आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत बाद फेरीत महाराष्ट्र मंडळ, टेनिसनट्स फेडल, एफसी जीएनआर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीत महाराष्ट्र मंडळ संघाने ओडीएमटी 1 संघाचा 21-06 असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्र मंडळ संघाकडून संजय सेठी, राजेंद्र देशमुख, धरणीधर मिश्रा, महेश जाधव, अभिषेक चव्हाण, आकाश खैरे यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात दिपक पाटील, जॉय बॅनर्जी, वेंकटेश आचार्य, भूषण सरदेसाई, अमित किंदो, नितीन सावंत यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर टेनिसनट्स फेडल संघाने डेक्कन ऍव्हेंजर्स संघाचा 24-04 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अन्य लढतीत एफसी जीएनआर संघाने एसेस युनायटेडचा 23-09 असा पराभव केला.
निकाल: बाद फेरी:
एफसी जीएनआर वि.वि.एसेस युनायटेड 23-09(100अधिक गट: संजय रासकर/पुष्कर पेशवा पराभूत वि.सुनील लुल्ला/मयूर पारेख 5-6(4-7); 90 अधिक गट: पंकज यादव/मनोज कुलकर्णी वि.वि.सुनील खेमचंदानी/होझिफा हकीम 6-0; खुला गट: संग्राम चाफेकर/यश देशमुख वि.वि.सुनील लुल्ला/रतीश रतूसरिया 6-1; खुला गट: अनिश नवठे/शांभवी नाडकर्णी वि.वि.रोहन नाईक/जयदीप अगरवाल 6-2);
टेनिसनट्स फेडल वि.वि.डेक्कन ऍव्हेंजर्स 24-04(100अधिक गट: माधव भट/सी कुमार पराभूत वि.संतोष जयभाई/शिवाजी यादव 3-6; 90 अधिक गट: दिपक पाटील/जॉय बॅनर्जी वि.वि.आनंद कोटस्थाने/शंतनू शौरी 6-1; खुला गट: वेंकटेश आचार्य/भूषण सरदेसाई वि.वि.केतन जाठर/वेद भंडारी 6-0; खुला गट: अमित किंदो/नितीन सावंत वि.वि.संतोष जयभाई/गोपीनाथ जयभाई 6-0);
महाराष्ट्र मंडळ वि.वि.ओडीएमटी 1 21-06(100अधिक गट: कमलेश शहा/विकास बचलू पराभूत वि.व्ही एस गुप्ते/रोहन सारे 3-6; 90 अधिक गट: संजय सेठी/राजेंद्र देशमुख वि.वि.गणेश जोशी/कोनार कुमार 6-0; खुला गट: धरणीधर मिश्रा/महेश जाधव वि.वि.मारुती राऊत/कौस्तुभ देशमुख 6-0; खुला गट: अभिषेक चव्हाण/आकाश खैरे वि.वि.अतुल जोशी/हिमांशू कपाटिया 6-0).