पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत आठव्या दिवशी ईगल नाशिक टायटन्स व रायगड रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हा सामना आज(१० जुन रोजी)सकाळी १०.३० वाजता प्रत्येकी पाच षटकांचा होणार आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायगड रॉयल्सच्या मनोज इंगळेने प्रभावी मारा करत मंदार भंडारी(८), अर्शिन कुलकर्णी(६), दिग्विजय देशमुख(०) या वरच्या फलंदाजांना तंबूत परत पाठवले. ३बाद १८ असा अडचणीत असताना अथर्व काळेने एकाबाजूने लढताना ३४चेंडूत ३चौकार व २षटकाराच्या मदतीने ४१धावा केल्या. तनय संघवीने अथर्व काळेला ४१धावांवर झेल बाद करून नाशिक संघाला ५ बाद ७३ असे अडचणीत आणले. त्यानंतर धनराज शिंदेने आक्रमक खेळी करत २२चेंडूत ४० धावांची खेळी केली. त्याने ४चौकार व २षटकार मारले. त्याला कौशल तांबेने २६धावा काढून साथ दिली. धनराजने कौशल तांबेच्या समवेत सातव्या विकेटसाठी ३१चेंडूत ५३धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. ईगल नाशिक टायटन्स संघाने २०षटकात ९ बाद १५४धावा केल्या.
रायगड रॉयल्स संघ ३चेंडूत बिनबाद ० असा असताना पाऊस सुरु झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी पाच षटकांचा होणार आहे.
संक्षिप्त धावफलक:
ईगल नाशिक टायटन्स: २०षटकात ९ बाद १५४धावा(अथर्व काळे ४१(३४,३x४,२x६), धनराज शिंदे ४०(२२,४x४,२x६), कौशल तांबे २६, रोहीत हडके ११, तनय संघवी ३-२२, मनोज इंगळे ३-३२, विकी ओस्तवाल २-२७) वि.रायगड रॉयल्स: ०.३ षटकात बिनबाद(सिद्धेश वीर नाबाद ०, नौशाद शेख नाबाद ०).