पुणे। पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी) यांच्या वतीने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र राज्य 8वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटात निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीत पुण्याच्या अविरत चौहान, मुंबई उपनगरच्या विहान अग्रवाल, नागपूरच्या चिराग लाहोटी यांनी तर, मुलींच्या गटात ठाण्याच्या आरा लोटणकर, रायगडच्या आरोही पाटील या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली.
सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर, प्रभातरोड, पुणे येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात पुण्याच्या अविरत चौहान याने अहमदनगरच्या रियान खंडेलवालचा पराभव करून 1गुण प्राप्त केला. तर, मुंबई उपनगरच्या विहान अग्रवालने ठाण्याच्या अभिमान खानविलकरचा, तर नागपूरच्या चिराग लाहोटीने मुंबई शहरच्या कृष्णव दर्यानानीचा पराभव करून 1गुण मिळवला.
मुलींच्या गटात ठाण्याच्या आरा लोटणकर हिने मुंबईच्या आराध्या मिगलानीला पराभूत करून 1गुण मिळवला. रायगडच्या आरोही पाटीलने पुण्याच्या सारा माहेश्वरीचा पराभव करून 1गुणांची कमाई केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन स्पर्धेचे सहप्रायोजक होडेक प्रायव्हेट लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक हर्निश राजा, सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरचे अध्यक्ष डॉ.सतीश ठिगळे, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, एमसीएचे सचिव निरंजन गोडबोले, एमसीएचे सहसचिव अंकुश रक्ताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, पीडीसीसीचे खजिनदार चंद्रकांत मोकाशी, सिद्धार्थ मयूर आदी मान्यवर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय आरबीटर विनिता क्षोत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
निकाल: पहिली फेरी(व्हाईट व ब्लॅक नुसार): 8 वर्षांखालील मुले:
अविरत चौहान(पुणे)(1गुण) वि.वि.रियान खंडेलवाल(अहमदनगर)(0गुण);
अभिमान खानविलकर(ठाणे)(0गुण) पराभूत वि.विहान अग्रवाल(मुंबई उपनगर)(1गुण);
चिराग लाहोटी(नागपूर)(1गुण) वि.वि.कृष्णव दर्यानानी(मुंबई शहर)(0गुण);
अद्विक क्षीरसागर(औरंगाबाद)(0गुण) पराभूत वि.अव्यय गर्ग(मुंबई)(1गुण);
अर्जुन सिंग(मुंबई उपनगर)(1गुण) वि.वि.अथर्व कुलकर्णी(मुंबई)(0गुण);
प्रजीत कुलकर्णी(ठाणे)(0गुण) पराभूत वि.सोनी विवान(कोल्हापूर)(1गुण);
आरव सांघवी(मुंबई)(1गुण) वि.वि.अभिराज कुंफाळे(जालना)(0गुण);
रुद्र अग्रवाल(जालना)(1गुण) वि.वि.ध्रुव लाहोटी(मुंबई)(0गुण);
लक्ष्य अग्रवाल(मुंबई)(1गुण) वि.वि.वर्दन अग्रवाल(मुंबई)(0गुण);
8 वर्षांखालील मुली:
आरा लोटणकर(ठाणे)(1गुण) वि.वि.आराध्या मिगलानी(मुंबई)(0गुण);
आरोही पाटील(रायगड)(1गुण) वि.वि.सारा माहेश्वरी(पुणे)(0गुण);
नारायणी मराठे(नंदुरबार)(0गुण) पराभूत वि.अमया रॉय(एमसीडीसीए)(1गुण);
आस्मि रोहित(नाशिक)(1गुण) वि.वि.दिविजा नादरगी(सोलापूर)(0गुण);
किमया निगम(मुंबई)(0गुण) पराभूत वि.अनन्या बाळापूरे(सोलापुर)(1गुण).
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन महिलांची शंभरी! केली पुरुष संघांनाही न जमलेली ‘अद्वितीय’ कामगिरी
WIvENG: बोनर-होल्डरने फेरले इंग्लंडच्या विजयाच्या अपेक्षांवर पाणी! कडवी झुंज देत टाळा पराभव
पीवायसी रिबाउंड रॅकेट लीग २०२२ स्पर्धेत रावेतकर मस्कीटर्सचा सलग दुसरा विजय