fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

महाराष्ट्र कबड्डी असोशियशनचे वार्षिक पुरस्कार जाहीर

औरंगाबादच्या ज्ञानदेव मुळे ला ” श्रमजीवी कार्यकर्ता,” रत्नागिरीच्या सुरेश पावसकरला ” जेष्ठ कार्यकर्ता”, रत्नागिरीच्याच अजिंक्य पवारला ” स्व. मधुसूदन पाटील (यंदाचा उत्कृष्ट खेळाडू)” , पुण्याच्या शुभांगी दाते-जोगळेकर आणि हिंगोलीच्या निवृत्ती बांगरला “जेष्ठ खेळाडू” म्हणून पुरस्कार जाहीर!
यंदा देखील” महाराष्ट्र कबड्डी जीवन गौरव” पुरस्कार कोणालाच दिला गेला नाही.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्यावतीने प्रतिवर्षी कबड्डी महर्षी स्व. बुवा साळवी यांचा जन्मदिन “कबड्डी दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा हा मान दुसऱ्यानंदा मुंबई उपनगर कबड्डी असो.ला मिळाला. मुंबई उपनगर कबड्डी असो च्या विद्यमाने दि. १५जुलै २०१९ रोजी सायं.५-००वा. रंगशारदा सभागृह, के. सी. मार्ग , लीलावती हॉस्पिटल जवळ, बांद्रे (प.), मुंबई ४०००५० येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कबड्डीकरिता उल्लेखनीय व आदरणीय कार्य करणाऱ्या जेष्ठ खेळाडू, जेष्ठ कार्यकर्ता, जेष्ठ पंच, क्रीडा पत्रकार आदींना अमृत कलश, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येते. किशोर व कुमार गटातील ३-३ मुला-मुलींना रोख रु. पाच हजार शिष्यवृत्ती देण्यात येते.

यंदाचा मल्हारराव बावचकर वरिष्ठ गटाचा( रोख रु.पाच हजार) पुरस्कार रायगडच्या मितेश च. पाटील आणि पुण्याच्या आम्रपाली गलांडे यांना, तर मानाचा मधुसूदन पाटील (रोख रु.दहा हजार) रत्नागिरीच्या अजिंक्य पवारने पटकाविला. सुरेश पावसकर (रत्नागिरी), कृष्णा तोडणकर(मुंबई शहर), लक्ष्मणराव सारोळे (लातुर), यांना “जेष्ठ कार्यकर्ता, बाळकृष्ण विचारे(मुंबई शहर), अनंत शिंदे (उपनगर), लक्ष्मणराव मोहिते (उस्मानाबाद), शिवाजी खांडरे(औरंगाबाद), लक्ष्मण जाधव(सोलापूर) यांना जेष्ठ पंच, निवृत्ती बांगर(हिंगोली), शुभांगी दाते-जोगळेकर (पुणे) यांना जेष्ठ खेळाडू, जयंत कुलकर्णी-लोकमत (औरंगाबाद), समीर सावंत (मुंबई) यांना क्रीडा पत्रकार, ज्ञानदेव मुळे(औरंगाबाद) यांना ” श्रमजीवी कार्यकर्ता”, तर बाबाजी दुर्रराणी(परभणी), पांडुरंग पार्टे (उपनगर) यांना कृतज्ञता पुरस्कार म्हणून राज्य कबड्डी संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आले.

गेली चार-पाच वर्षे “महाराष्ट्र कबड्डी जीवन गौरव” पुरस्कार कोणालाच दिला गेला नाही. यंदा देखील राज्य संघटनेला या पुरस्काराकरिता कोणी लायक व्यक्ती सापडली नाही. राजाराम पवार, दौलतराव शिंदे, डी. जी. चिपरिकर, रमेश देवाडीकर यांच्या सारखे हाडाचे कार्यकर्ते काळाच्या पडद्या आड गेले. याकडे लक्ष देऊन तरी संघटनेने योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड करून सच्चा कार्यकर्त्यांना न्याय द्यावा असे कबड्डी प्रेमींना वाटते.

या कार्यक्रमाच्या निमिताने सर्व आजी माजी अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच सर्व खेळाडू, कार्यकर्ते , पंच, कबड्डी प्रेमी यांना देखील या परिपत्रकाद्वारे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान राज्य संघटना व मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या वतीने करण्यात आले आहे.

You might also like