---Advertisement---

७१व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर

---Advertisement---

मुंबई: ओडिसा येथे होणाऱ्या ७१व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आज आपला पुरुष संघ जाहीर केला. ओडिसा, कटक येथील जे. एन. बंदिस्त क्रीडा संकुल येथे दिनांक २० ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ही स्पर्धा खेळविण्यात येईल. नाशिकच्या आकाश शिंदेकडे पुन्हा एकदा या संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे. गतवर्षी अहमदनगर, महाराष्ट्र येथे झालेल्या ७०व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत धडक देत तृतीय क्रमांक मिळविला होता. निवडण्यात आलेला हा संघ १९ फेब्रुवारी रोजी पहाटे स्पर्धेकरिता कटक येथे रवाना होईल. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ने एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना दिली.

निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे-

पुरुष संघ:- १) आकाश शिंदे – संघनायक, २) आकाश रूडले, ३) शंकर गदई, ४) तेजस पाटील, ५) संकेत सावंत, ६) अक्षय सूर्यवंशी, ७) मयूर कदम, ८) शिवम पठारे, ९) प्रणय राणे, १०) अजित चौहान, ११) कृषिकेश भोजने, १२) संभाजी वाबळे.

महत्त्वाच्या बातम्या-

WPL 2025: रिचा घोषने मैदान गाजवलं, आरसीबीने गुजरातचा धुव्वा उडवत रचला इतिहास!
सलग दुसर्‍यांदा महाराष्ट्राच्या पदकाचे व्दिशतक
माजी क्रिकेटपटूने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडली भारताची प्लेइंग 11, पण ‘या’ दिग्गजाला वगळले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---