मुंबई:- ७१व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा महिला संघ जाहीर करण्यात आला. पुण्याच्या रेखा सावंत हिच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. हरियाणा, मोरमाजरा, कर्नाल येथील आर्य कन्या गुरुकुलच्या बंदिस्त क्रीडा संकुल येथे दिनांक १५ ते १८ फेब्रु. २०२५ या कालावधीत हे सामने होतील. या स्पर्धेतून भारताचा महिला संघ निवडण्यात येईल. हा निवडण्यात आलेला संघ इराण येथे होणाऱ्या आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. महाराष्ट्राचा हा निवडण्यात आलेला संघ आज दिनांक १३फेब्रु. रोजी दुपारी ११-३० वाजता मुंबई सेंट्रल येथून हरियाणाला स्पर्धेकरीता रवाना झाला. अशी माहिती एका पत्रकाद्वारे राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमांना दिली.
निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.
महिला संघ:- १)रेखा सावंत – संघनायिका, २)आम्रपाली गलांडे, ३)मंदिरा कोमकर, ४)सलोनी गजमल, ५)समरिन बुरोंडकर, ६)तसलीम बुरोंडकर, ७)पूजा यादव, ८)प्रणाली नागदेवते, ९)माधुरी गवंडी, १०)ज्युली मिस्किटा, ११)निकिता पडवळ, १२)दिव्या गोगावले.
प्रशिक्षक :- संतोष शिर्के. व्यवस्थापिका:- सोनाली जाधव.