पुणे । महाराष्ट्र सॅम्बो असोसिएशन आणि सॅम्बो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित १० व्या राष्ट्रीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद पटकाविले. पंजाबच्या संघाने द्वितीय तर केरळ संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेत २४ राज्यातून ३६९ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महाळुंगे बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्राच्या संघाने एकूण ६७ पदके पटकाविली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी सॅम्बो युनियन आशियाचे उपाध्यक्ष अबोदुलोएव मखमुद, सनी वागचोरे, संजय गुजर,सॅम्बो फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव दिप्तीराम शर्मा, महाराष्ट्र सॅम्बो असोसिएशनचे सचिव अनुप नाईक, विजय तांबे,अमित कदम, सुशील जाधव, सुधीर गरुड, नारायण वारे, उद्योजक निलेश भिंताडे उपस्थित राहणार आहेत.
अनुप नाईक, अर्जुन पवार, स्वामी महात्मे, सत्यवान वाघमोडे, रवी पवार, कुमार उगाडे, सुधीर गरुड, आबाजी माने, चेतन पाटोळे, प्रतीक साळुंके, रोहित पुनगडवाले, गणेश कोडगी यांनी स्पर्धेचे नियोजन केले.