पुणे। कमांडोज संघाने गुरुवारी (दि. ०९ जून) येथे पीडीएफए महिला लीगमध्ये केशव माधव प्रतिष्ठानवर 6-0 असा दणदणीत विजय मिळवत आपली आगेकूच कायम राखली. यामध्ये महेक शेख हिने आपली छाप पाडताना शानदार हॅटट्रिक साधली.
अ गटाच्या एकतर्फी सामन्यात, महेकने १५व्या, २१व्या, ५९व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी केली. सामन्यात
कविता यादव (23वे), कांचन शर्मा (34वे), हर्षदा शर्मा (45वे) यांनी अन्य गोल केले.
उत्कर्ष क्रीडा मंचने त्यांच्या ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी आपापल्या लढती जिंकून आजचा दिवस साजरा केला. ब गटात विविका दयाल (11वे) हिने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर उत्कर्ष क्रीडा मंच अ संघाने एफसी बेकडिन्होचा 1-0 असा पराभव केला.
उत्कर्षच्याच ब संघाने अरणा सिंधव (13वे) आणि अनिका टोपले (56वे) यो दोघींनी केलेल्या गोलच्या जोरावर सासवड एफसी चा 2-0 ने पराभव केला.
निकाल-
एसएसपीएमएस मैदान महिला लीग-
गट ब : उत्कर्ष क्रीडा मंच ‘अ’: 1 (विविका दयाल 11वे) वि.वि. एफसी बेकडिन्हो: 0
गट अ : उत्कर्ष क्रीडा मंच ‘ब’: 2 (अरणा सिंधव 13वे; अनिका टोपले 56वे) वि.वि. सासवड एफसी 0
गट अ : कमांडोज: 6 (महेक शेख 15वे, 21वे, 59वे, कविता यादव 23वे, कांचन शर्मा 34वे,हर्षदा शर्मा 45वे,) वि.वि. केशव महादव प्रतिष्ठान 0
गट अ – सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्स: 3 (पियुषा नरके 4थे, 51वे,; अभिलाषा मेहरा 41वे,) वि.वि. दिएगो ज्युनियर्स: 1 (यशिका तेजवानी)
एसएसपीएमएस मैदान द्वितीय विभाग, सुपर-8
डेक्कन इलेव्हन ‘सी’: ० बरोबरी वि. डायनामाईट्ससह ०
फोटो ओळ – डिएगो ज्युनियर्स (निळी जर्सी) आणि सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्स (केशरी जर्सी ) यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यातील एक क्षण.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुणेरी वॉरियर्स, एएफए सॅमफोर्ड, भारती एफसी उपांत्यपूर्व फेरीत
सहज विजयासह सिटी एफसी पुणे सुपर ८ मध्ये
घोरपडी युनायटेडची आगेकूच कायम; अस्पायर गुणतक्त्यात अव्वल