fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर मुंबईच्या कर्णधाराने ‘या’ विक्रमात केली चेन्नईच्या कर्णधाराची बरोबरी

Man of the match rohit sharma 2

September 24, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) कडून पराभव झाला होता. मुंबईचा यूएई मधील हा सलग पाचवा पराभव होता. मात्र काल 23 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी पराभूत केले. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यामुळे त्याची सामनावीर म्हणून निवड झाली.

मुंबईने योजना व्यवस्थितपणे राबविल्या

रोहितने केवळ 39 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात 54 चेंडूत 80 धावा केल्या. या डावात त्याने 6 षटकार आणि 4 चौकार ठोकले. विजयानंतर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “आज आम्ही आमच्या योजना व्यवस्थितपणे राबविल्या, आम्ही या सामन्यात नेहमीच चांगल्या स्थितीत होतो. खेळपट्टी चांगली होती आणि दव कमी होते. पुल फटके खेळायला मला आवडते. मी या फटक्यांचा बराच सराव केला आहे. संघाच्या कामगिरीमुळे खूप आनंद झाला आहे. माझे सर्व फटके चांगले होते. मी गेल्या सहा महिन्यांत क्रिकेट खेळलो नाही आणि त्या कारणास्तव मला खेळपट्टीवर थोडा वेळ घालवायचा होता.”

युएईमध्ये आयपीएल होईल याची नव्हती कल्पना

पुढे बोलतांना तो म्हणाला, “आयपीएल युएईमध्ये होईल हे आम्हाला माहीत नव्हते, त्यामुळे वानखेडे स्टेडियम मधील खेळपट्टीला अनुकूल असे वेगवान गोलंदाज आम्हाला हवे होते. कदाचित मी शेवटच्या क्षणी थोडा थकलो होतो आणि आम्हाला शेवटपर्यंत फलंदाजी करणार्‍या एका फलंदाजाची गरज होती. आम्हाला यापूर्वीच हे समजले आणि आज मी शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न केला.”

रोहितने आयपीएलमध्ये ठोकले 200 षटकार

असे फक्त 4 फलंदाज आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये 200 किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. आता रोहितही त्या 4 फलंदाजांपैकी एक बनला आहे. रोहितशिवाय आतापर्यंत फक्त एमएस धोनी, एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेल ही कामगिरी करु शकले आहेत.

आयपीएलमध्ये रोहितचे 200 षटकार आहेत, तर धोनीने आतापर्यंत 212 षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत 214 षटकार ठोकणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्स धोनीनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर, षटकार ठोकण्याच्या बाबतीत पहिले नाव किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज ख्रिस गेल याचे आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 326 षटकार ठोकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-२ मोठे विक्रम केले पण ‘या’ गोष्टीमुळे मोठ्या विक्रमापासून रोहित शर्मा राहिला दूर

-एका मराठी चाहत्याला आपलं शेवटचं ट्विट करत या महान क्रिकेटपटूने जगातून घेतली एक्झिट

-राजस्थानविरुद्ध पराभव झाल्यानंतर माजी दिग्गज भडकला; म्हणाला, ‘सामना जिंकणार नाहीत हे धोनीने आधीच ठरवले होते,’

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज

-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज

-श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….


Previous Post

२ मोठे विक्रम केले पण ‘या’ गोष्टीमुळे मोठ्या विक्रमापासून रोहित शर्मा राहिला दूर

Next Post

दिल्ली विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचे ‘हे’ दोघे शिलेदार नक्की बरे होतील, संघाला आहे आशा

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त ‘इतके’ दिवस

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricket.com.au
टॉप बातम्या

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील खेळपट्ट्यांना आयसीसीने दिली रेटिंग, ३६ धावांत भारताचा डाव आटोपलेली खेळपट्टी ठरली…

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बेअरस्टोने केली ‘जादू’! चालू सामन्यात लाल चेंडूला बनवले पांढरे

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ englandcricket
टॉप बातम्या

एका खेळीने दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला रूट, केली ‘ही’ विक्रमी कामगिरी

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

SL vs ENG : दुसर्‍या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा धुव्वा, इंग्लंडचे मालिकेत निर्भेळ यश

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
क्रिकेट

जर आरसीबीने ‘ही’ गोष्ट केली असती, तर आज कोहली नव्हे धोनी असता संघाचा कर्णधार

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL

दिल्ली विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचे 'हे' दोघे शिलेदार नक्की बरे होतील, संघाला आहे आशा

Photo Courtesy: www.iplt20.com

मुंबई विरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया; म्हणाला 'या' क्षेत्रात करावी लागेल सुधारणा

Photo Courtesy: www.iplt20.com

“गेल्या 18 महिन्यांपासून मी अव्वल क्रमांकाचा चिअरलीडर आहे,” पाहा कोण म्हणतंय

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.