---Advertisement---

‘मॅन वर्सेस वाइल्ड’ फेम बियर ग्रिल्सनं हाती घेतली बॅट! क्रिकेटच्या मैदानावर केली जोरदार फटकेबाजी

---Advertisement---

लोकप्रिय टीव्ही मालिका ‘मॅन वर्सेस वाइल्ड’नं जगभर प्रसिद्ध झालेला ब्रिटनचा सर्व्हायव्हल एक्सपर्ट ‘बियर ग्रिल्स’ नुकताच क्रिकेटच्या मैदानावर दिसला. लोकांना सर्व्हायव्हल टिप्स देणारा बियर चक्क क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करताना दिसला!

वास्तविक, बियर ग्रिल्स एका खास उद्देशानं क्रिकेट खेळण्यासाठी आला होता. तो ‘रुथ स्ट्रॉस फाऊंडेशन’ला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर उतरला होता. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस याचं हे फाऊंडेशन आहे. बियर ग्रिल्स जेव्हा मैदानावर आला, तेव्हा तो फलंदाजी करू शकेल याची कोणालाच खात्री नव्हती. मात्र त्यानं शानदार फलंदाजी करत मोठमोठे फटके मारले. तो अँड्र्यू स्ट्रॉससोबत फलंदाजीला आला होता.

ग्रिल्सच्या फलंदाजीचा व्हिडिओ ‘क्रिकेट डिस्ट्रिक्ट’नं इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहते बियरच्या फटकेबाजीचा आनंद घेत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cricket District (@cricketdistrict)

 

अँड्र्यू स्ट्रॉसचं ‘रुथ स्ट्रॉस फाउंडेशन’ फुफ्फुसाच्या कर्करोगानं पीडित रुग्णांना मदत करण्यासाठी काम करतं. स्ट्रॉस यांनं 2018 मध्ये ही संस्था सुरू केली होती. 2018 मध्ये त्याची पत्नी रुथ हिचा फुफ्फुसाच्या कर्करोगानं मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यानं या संस्थेची स्थापना केली.

पत्नीच्या मृत्यूनंतर स्ट्रॉसनं मोठं पाऊल उचललं आणि ‘रुथ स्ट्रॉस फाउंडेशन’ सुरू केलं. या संस्थेनं आतापर्यंत अनेक कर्करोगग्रस्तांना मदत केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून लोकांमध्ये कर्करोगासंबंधी जागरुकता वाढवली जाते. आपल्या संस्थेच्या मोहिमेला बळकटी देण्यासाठी आणि निधी उभारण्यासाठी स्ट्रॉसनं ‘रॉक फॉर ट्रूथ’ मॅच आयोजित केली होती. या खास सामन्यात बियर ग्रिल्स खेळण्यासाठी आला होता. ग्रिल्सच्या आधीही अँड्र्यू स्ट्रॉसच्या संस्थेला पाठिंबा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी मैदानावर क्रिकेट खेळताना दिसले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

बांग्लादेशच्या गोलंदाजाची नेपाळच्या कर्णधाराशी धक्काबुक्की, BAN vs NEP सामन्यात मोठा राडा!
सुपर-8 मध्ये भारताचा सामना कोणत्या संघासोबत कधी होणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
‘फादर्स डे’च्या दिवशी मुलाच्या आठवणीनं भावूक झाला शिखर धवन, शेअर केली इमोशनल पोस्ट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---