---Advertisement---

Duleep Trophy: भारताच्या ‘या’ स्टार फिरकीपटूची खतरनाक गोलंदाजी, घेतल्या 7 विकेट्स

Manav Suthar
---Advertisement---

सध्या दुलीप ट्राॅफी स्पर्धा (Duleep Trophy) खेळली जात आहे. त्यातील दुसरा सामना इंडिया-सी विरुद्ध इंडिया-डी यांच्यामध्ये अनंतपुर येथे खेळला गेला. या सामन्यात इंडिया-सी संघाने 4 गडी राखून शानदार विजय मिळवला. तत्पूर्वी या सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील इंडिया-डी विरुद्ध इंडिया-सी चा गोलंदाज मानव सुथारने (Manav Suthar) 7 विकेट्स घेत खळबळ उडवून दिली आणि खास रेकाॅर्ड आपल्या नावावर केला.

डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने (Manav Suthar) (19.1) षटकात 7 मेडन ओव्हर फेकल्या. त्यामध्ये त्याने एकूण 49 धावा दिल्या आणि 7 विकेट्स घेतल्या. त्याने घेतलेल्या विकेट्समध्ये देवदत्त पडीक्कल, केएस भरत आणि अक्षर पटेल यांसारख्या स्टार खेळाडूंचा देखील समावेश होता. दरम्यान मानवचा इकाॅनाॅमी रेट 2.60 होता. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे इंडिया-डी संघ दुसऱ्या डावात 236 धावांवर गारद झाला.

अनंतपूरमध्ये क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये 5 घेणारा मानव सुथार (Manav Suthar) हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. 2006 मध्ये केपी अप्पाण्णाने याच मैदानावर 5 विकेट्स घेण्याचा रेकाॅर्ड केला होता. त्यानंतर आता मानव सुथारच्या नावावर देखील 7 विकेट्ससहित खास रेकाॅर्ड झाला आहे.

22 वर्षीय मानव सुथारचा जन्म राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये झाला. मानव हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानचा भाग आहे. तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. त्याला आयपीएल 2024 मध्ये फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. याशिवाय तो 19 वर्षांखालील आणि अ संघाचाही भाग होता. त्याने 14 प्रथम श्रेणी सामन्यात 65 विकेट घेतल्या आहेत. लिस्ट-ए च्या 8 सामन्यांमध्ये त्याने 15 विकेट्स घेतल्या, तर 8 टी20 सामन्यांमध्ये त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“तेंडुलकरने अख्तरला खतरनाक…” 2003च्या विश्वचषकाची आठवण करून देत ‘या’ दिग्गजाचे मोठे वक्तव्य
Duleep Trophy: रुतुराज गायकवाडच्या संघाची शानदार विजयाने सुरुवात!
वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---