Loading...

मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ‘यांचा’ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे। बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील) स्नूकरमध्ये मुलांच्या गटात स्पर्श फेरवानी, एस.श्रीकृष्णा, दिग्विजय कडीयन, प्रियांश जैन, रणवीर दुग्गल या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील) स्नूकर मुलांच्या गटात बाद फेरीत महाराष्ट्राच्या स्पर्श फेरवानी याने पंजाबच्या ध्रुव चावलाचे आव्हान 3-0(62-48, 87(80)-08, 72-19) असे मोडीत काढले.

पीएसपीबीच्या एस. श्रीकृष्णा याने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत झारखंडच्या ओवीस कामरानचा 3-0(55-21, 75-41, 121(113)-05)असा सहज पराभव केला. श्रीकृष्णा याने आपल्या खेळीत तिसऱ्या फ्रेममध्ये 113 गुणांचा ब्रेकदेखील नोंदविला.

दिल्लीच्या शोएब खान याने ओडिशाच्या अबिनाश मोहपात्राला 3-0(57-24, 82-22, 79-50) असे पराभूत केले. पश्चिम बंगालच्या प्रियांश जैन याने पंजाबच्या भवनीत वालियावर 3-1(27-57, 65-41, 87-20, 65-24) असा विजय मिळवला.

चुरशीच्या झालेल्या लढतीत तेलंगणाच्या के. विभास याने आपलाच राज्य सहकारी मुश्ताक खानचा 3-2(64-39, 48-58, 30-62, 58-24, 57-15) असा संघर्षपूर्ण पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. छत्तीसगडच्या रणवीर दुग्गल याने महाराष्ट्राच्या रोहित रावतचा 3-1(60-50, 29-56, 50-25, 58-48) अशा फरकाने पराभव करून आगेकूच केली.

Loading...

स्पर्धेचा सविस्तर निकाल।

ज्युनियर स्नूकर |

बाद फेरी।

स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र)वि.वि.ध्रुव चावला(पंजाब)3-0(62-48, 87(80)-08, 72-19);

Loading...

एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी)वि.वि.ओवीस कामरान(उत्तराखंड)3-0(55-21, 75-41, 121(113)-05);

रयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.खाजा मोईनुद्दीन(आंध्रप्रदेश)3-0(61-23, 70(47)-14, 84-50);

ध्रुव पटेल(गुजरात)वि.वि.विश्वास मंगला(हरयाणा)3-1(93(46)-01, 49-51, 72-43, 68-07);

करमेश पटेल(गुजरात)वि.वि.एस. विश्वनाथ रेड्डी(तेलंगणा)3-1(67-17, 20-93, 60-01, 67-13);

Loading...

सुमेर मागो(महाराष्ट्र)वि.वि.रणवीर सिंग मारवा(गुजरात)3-1(54-44, 61-07, 25-61, 43-24);9

के. विभास(तेलंगणा)वि.वि.मुश्ताक खान(तेलंगणा)3-2(64-39, 48-58, 30-62, 58-24, 57-15);

दिग्विजय कडीयन(हरयाणा)वि.वि.आल्ड्रिन मोसेस(तेलंगणा)3-0(63-54, 74-46, 101(101)-18);

विश्वजित मोहन(उत्तरप्रदेश)वि.वि.इरफान अख्तर(केरळ)3-0(59-47, 67-24, 57-09);

शोएब खान(दिल्ली)वि.वि.अबिनाश मोहपात्रा(ओडिशा)3-0(57-24, 82-22, 79-50);

Loading...

प्रियांश जैन(पश्चिम बंगाल)वि.वि.भवनीत वालिया(पंजाब)3-1(27-57, 65-41, 87-20, 65-24);

रणवीर दुग्गल(छत्तीसगड)वि.वि.रोहित रावत(महाराष्ट्र)3-1(60-50, 29-56, 50-25, 58-48);

उमर उल इस्लाम(जम्मू व काश्मीर)वि.वि.कबीर शर्मा(पश्चिम बंगाल)3-0(55-27, 47-40, 58-31);

आदेश कोठारी(तामिळनाडू)वि.वि.वरून कुमार(कर्नाटक)3-1(67-55, 34-54, 55-02, 81-43);

अमन बनसोड(मध्यप्रदेश)वि.वि.शयान राझमी(महाराष्ट्र)3-2(68-55, 32-70, 69(69)-00, 18-68, 70-43);

Loading...

क्रिश गुरबक्षानी(महाराष्ट्र)वि.वि.देवांग सिंग(मध्यप्रदेश)3-1(73(40)-06, 17-76(68), 64(46)-08, 59-09).

You might also like
Loading...