क्रिकेटच्या मैदानावर रोज नवनवीन विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये फलंदाज अनेकदा गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत असतात. लांब षटकार आणि चौकार तर आजकाल हमखास पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये जसजशी प्रगती झाली तसतशी फलंदाजी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारतीय फलंदाजांनीही अनेक विक्रम केले आहेत, असाच एक अनोखा विक्रम भारतीय फलंदाजाने केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेला फलंदाज त्याच्या कारकिर्दीत किमान एक किंवा दुसरा षटकार मारतो, पण असा एक भारतीय फलंदाज आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत एकही षटकार मारला नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज मनोज प्रभाकरने (Manoj Prabhakar) आपल्या १२ वर्षाच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत एकही षटकार मारलेला नाही. १९८४ ते १९९६ या काळात एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा संघात समावेश होता. मनोज प्रभाकर भारतासाठी १३० एकदिवसीय सामने खेळला आहे. या सामन्यांत त्याने २ शतक आणि ११ अर्धशतकांसह १८०० हून अधिक धावा केल्या आहेत. एक उत्कृष्ट फलंदाज असूनही, त्याला एकदिवसीय कारकिर्दीत एकही षटकार मारता आला नाही (never hit six).
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मनोज प्रभाकरसोबतच अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत एकही षटकार मारलेला नाही. श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज थिलन समरवीरा, ऑस्ट्रेलियासाठी २००९ मध्ये पदार्पण करणारा कॅलम फर्ग्युसन, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू जोफ्री बॉयकॉट आणि झिम्बाब्वेचा माजी फलंदाज डियोन इब्राहिम यांचाही या विक्रमात समावेश आहे.
मनोज प्रभाकरची कारकिर्द
मनोज प्रभाकरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३९ कसोटी सामने खेळले. यात ३२.६५ च्या सरासरीने १ शतक आणि ९ अर्धशतकांसह १६०० धावा केल्या. तसेच कसोटीत मात्र, त्यानी ४ षटकार मारले आहेत. त्याचबरोबर गोलंदाजी करताना त्यानी ९६ विकेट्सही घेतल्या. याशिवाय १३० एकदिवसीय सामन्यात १८५८ धावा करण्याबरोबरच १५७ विकेट्सही घेतल्या आहेत.
त्यांनी १५४ प्रथम श्रेणी सामने खेळताना २० शतके आणि ३० अर्धशतकांसह ७४६९ धावा केल्या आहेत आणि ३८५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर २१४ अ दर्जाचे सामने खेळले असून ४११८ धावा केल्या आहेत आणि २६९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात है! जमशेदपूर एफसीची ऐतिहासिक कामगिरी, विक्रमासह प्रथमच जिंकली लीग शिल्ड!
असे दोन खेळाडू ज्यांनी रनमाशिन विराट सोबत केले कसोटी पदार्पण, मात्र….
पाकिस्तानात ७१ वे शतक ठोकणार विराट कोहली? पोस्टर अन् बॅनर घेऊन चाहते रावळपिंडी कसोटीत हजर