भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी ऑगस्ट 2023च्या पहिल्या आठवड्यात निवृत्त झाला होता. त्याने 3 ऑगस्ट रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली होती. पण मंगळवारी (8 ऑगस्ट) तिवारीने आपली निवृत्ती माघारी घेतल्याचे समजते. ही माहिती अध्यावर अधिकृतपणे सांगितली गेली नाहीये, पण माध्यमांतील वृत्तांनुसार तिवारीने आपला निर्णय मागे घेतला आहे.
लवकरच मनोज तिवारी (Manoj Tiwary) आपण निवृत्ती रद्द करत असल्याचे माध्यमांना सांगू शकतो. बंगाल क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष स्नेहाशीष गांगुली (Snehashish Ganguly) यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मनोज तिवारीने आपला निर्मय बदलला, असे सांगितले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की, सीएबी अध्यक्षांनी तिवारीकडे क्रिकेटमधून निवृत्त न होण्याची मागणी केली होती. तिवारीच्या नेतृत्वात बंगाल रणजी संघ मागच्या हंगामात उपविजेता ठरला होता. याच पार्श्वभूनीवर स्नेहाशीष गांगुलींना त्याच्याकडे निवृत्ती माघारी घेण्याची मागणी केली असावी.
तत्पूर्वी 3 ऑगस्ट रोजी मनोज तिवारीने आपल्या सोशल मीडियावर भारतीय जर्सीतील फोटो शेअर करत “धन्यवाद” असे लिहिले होते. “क्रिकेटने मला सर्वकाही दिले आहे. निवृत्ती घेत असताना मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी भूमिका या प्रवासात माझ्यासाठी महत्वाची राहिली आहे.”
दरम्यान, मनोज तिवारीच्या कारकिर्दीवर नजर टारली, तर त्याने भारतासाठी 12 वनडे आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान अनुक्रमे 287 आणि 15 धावांचे योगदान त्याने त्याने दिले. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 5 विकेट्सची नोंद देखील आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिवारने 141 सामन्यांमध्ये 9908 धावा केल्या असून 303* ही त्यीच सर्वोत्तम खेळी राहिली आहे. तसेच 32 विकेट्स देकील त्याने प्रथम श्रेणीमध्ये घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान संघाविषयी रोहित काय म्हणाला, ज्यामुळे रितिकालाही नाही आवरले हसू, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारतासाठी ‘करो या मरो’ स्थिती, पराभव स्वीकारला तर मोडीत निघणार 17 वर्षांपासूनची कामगिरी