Loading...

पीवायसी बुद्धिबळ लीग २०१९ स्पर्धेत मराठा वॉरियर्स, द बिशप्स चेक, गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स संघांची विजयी सलामी

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे पीवायसी बुद्धिबळ लीग स्पर्धेत मराठा वॉरियर्स, द बिशप्स चेक व गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मराठा वॉरियर्स संघाने 7 नाईट्स संघाचा 3.5-2.5 असा पराभव करत स्पर्धेत शानदार सुरुवात केली. अमित धर्माने इंद्रनील मांडकेचा 1-0 असा पराभव करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. यश मेहेंदळेने सारंग उधवर्षे याचा तर मिहिर शहाने माधुरी जाधवचा अनुक्रमे 1-0 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.

दुस-या लढतीत द बिशप्स चेक संघाने गोल्डन किंग संघाचा 3.5- 2.5 असा पराभव केला. विजयी संघाकडून अश्विन त्रिमल, चारू साठे, किरण खरे व केतन देवल यांनी संघाला विजय मिळवून दिला.

अन्य लढतीत गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स संघाने किंग्स 64 संघाचा 4-2 असा पराभव करत स्पर्धेत पहिला विजय मिळवला. गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स संघाच्या ईशान लागुने निरन भुरतचा 1-0 असा पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली. विजय ओगळेने रोहिन लागुचा तर अमोद प्रधानने राघव बर्वेचा अनूक्रमे 1-0 असा पराभव करत संघाची आघाडी कायम राखली. राजशेखर करमरकरने अकांश जैनचा 1-0 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला. स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुषार नगरकर, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, सारंग लागू, ज्योती गोडबोले, क्लबचे सीइओ कर्नल गिरी आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- राऊंड रॉबीन फेरी

मराठा वॉरियर्स वि.वि 7 नाईट्स: 3.5-2.5 (अमित धर्मा वि.वि इंद्रनील मांडके 1-0; राजेंद्र एरंडे पराभूत वि तन्मय चितळे 0-1; आदी जाधव पराभूत वि. निखिल चितळे 0-1; परम जलन बरोबरी वि.शुभंकर मेनन 0.5-0.5; यश मेहेंदळे वि.वि सारंग उधवर्षे 1-0; मिहिर शहा वि.वि माधुरी जाधव 1-0)

गोल्डन किंग पराभूत वि.वि द बिशप्स चेक: 2.5-3.5(अर्णव कुंटे पराभूत वि अश्विन त्रिमल 0-1; अजिंक्य साठे बरोबरी वि चारू साठे 0.5-0.5; प्रियदर्शन डुंबरे पराभूत वि किरण खरे 0-1; निरंजन गोडबोले वि.वि अभिषेक गोडबोले 1-0; हेमंत उधवर्षे वि.वि अनघा भिडे 1-0; तनिष्क गोरे पराभूत वि केतन देवल 0-1);

Loading...

किंग्स 64 पराभूत वि.वि गोल्डफिल्ड ट्रायडेंट्स: 2-4(निरन भुरत पराभूत वि ईशान लागु 0-1; रोहिन लागु पराभूत वि विजय ओगळे 0-1; राघव बर्वे पराभूत वि अमोद प्रधान 0-1; आदित्य लाखे वि.वि पराग चोपडा 1-0; जय केळकर वि.वि प्रशांत कुलकर्णी 1-0; अकांश जैन पराभूत वि राजशेखर करमरकर 0-1).

You might also like
Loading...