सिनेविश्व आणि क्रिकेटचं नातं जुनं आहे, हे आपल्या सर्वांनाच माहितीये. मात्र, भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचंही एका मराठी टीव्ही अभिनेत्रीशी जवळचं नातं आहे, हे खूप कमी लोकांना माहिती असेल. खरं तर, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती द्रविड ही राहुल द्रविडची पुतणी आहे. अदितीचाही समावेश त्या कोट्यवधी भारतीय चाहत्यांमध्ये होतो, ज्यांचा विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात भारत पराभूत झाल्यामुळे हृदय तुटले आहे. अशात अदितीला भारतीय संघाच्या पराभवासोबतच काका राहुल द्रविड याच्यासाठीही वाईट वाटले होते. विशेष म्हणजे, द्रविडचा कार्यकाळ विश्वचषकासोबतच संपुष्टात आला. आता अदितीने मोठी प्रतिक्रिया दिली.
भारतीय (Team India) संघाला विश्वचषक 2023 (World Cup 2023) विजेता बनवण्यासाठी कठोर मेहनत घेणाऱ्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Head Coach Rahul Dravid) याच्यासाठी अदिती द्रविड (Aditi Dravid) हिला खूपच वाईट वाटले. तिच्यानुसार, द्रविडने संघासोबतच स्वत:ही ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते, जे पूर्ण करण्यासाठी त्याने आपले सर्वस्व दिले होते, पण अखेरीस त्यांच्या हाती निराशा लागली.
अदितीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “राहुल द्रविड माझे काका आहेत. माझे वडील (विनायक द्रविड) मागील 30-35 वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात कार्यरत आहेत. माझे वडील स्वत: रणजीपटू आहेत. राहुल द्रविड आणि माझे नाते क्रिकेटमुळे घट्ट झाले. मी खूपच भावूक झाले होते. मला आज त्यांच्यासाठी खूप वाईट वाटत आहे. मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात त्यांचा कार्यकाळही संपत आला आहे. हा त्यांचा अखेरचा विश्वचषक होता. ते खूपच मेहनती आहेत. तसेच, त्यांनी खूप कष्ट घेतले आहे. मला वाटते की, ते सर्वोत्तम प्रशिक्षक आहे.”
View this post on Instagram
द्रविड काय म्हणाला?
अंतिम सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत द्रविडने सांगितले होते की, त्याचे संपूर्ण लक्ष भारतीय संघाला त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यात मदत करणे होते. त्याने प्रशिक्षकाच्या रूपात आपल्या भविष्याविषयी अद्याप कोणताही विचार केल नाही. तो म्हणाला होता, “सध्या माझे संपूर्ण लक्ष या अभियानावर होते आणि माझ्या डोक्यात इतर काहीच नव्हते. तसेच, भविष्यात काय होईल, याचा मी कोणताही विचार केला नाहीये. प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर मी याबाबत विचारही केला नाहीये. मला वाटते की, आमची सर्व उर्जा या स्पर्धेत आणि सामन्यावर केंद्रित होती.”
कोण आहे अदिती द्रविड?
अदिती द्रविड ही राहुल द्रविडची पुतणी तर आहेच, पण ती मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरादेखील आहे. तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने ‘गोष्ट एका पैठणीची’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमातही महत्त्वाची व्यक्तिरेखा निभावली होती. (marathi actress aditi dravid gets emotional indian coach rahul dravid world cup 2023 final loss said this know here)
हेही वाचा-
World Cup Finalच्या एक आठवड्यानंतर शमीची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘फक्त त्या दिवशी 300 धावा…’
Complaint filed against Mitchell Marsh: मार्शला वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवणे भोवणार! पोलिसात गेलं प्रकरण