आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसी सध्या 2022 या वर्षांचे आयसीसी पुरस्कार जाहीर करत आहे. आयसीसीने बुधवारी (25 जानेवारी) मागील वर्षी पदार्पण करत आपल्या शानदार खेळाने लौकिक वाढवणाऱ्या युवा खेळाडूंचा सन्मान केला. पुरुष विभागात आयसीसी एमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेचा युवा अष्टपैलू मार्को जेन्सन याने पटकावला. त्याने भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, अफगाणिस्तानचा इब्राहिम झादरान व न्यूझीलंडच्या फिन ऍलन यांना मागे टाकले.
Young South Africa pace sensation bags the ICC Men’s Emerging Cricketer of the Year 2022 award 🙌#ICCAwardshttps://t.co/Eto92cporS
— ICC (@ICC) January 25, 2023
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडत असलेल्या जेन्सन याने मागील वर्षी सातत्यपूर्ण कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. त्याने वर्षभरात 36 बळी आपल्या नावे केले. तर, संघाला गरज असताना अनेकदा महत्त्वपूर्ण धावा देखील जमवल्या.
त्याला या पुरस्कारासाठी भारताचा अर्शदीप सिंग याचे तगडे आव्हान होते. अर्शदीपने वनडे व टी20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत या पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेले. मात्र, कसोटी क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर जेन्सन याने हा पुरस्कार आपल्या नावे केला. महिला विभागात हा पुरस्कार भारताची युवा गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर हिने जिंकला.
जेन्सनच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 10 कसोटी सामन्यांमध्ये 41 बळी टिपले आहेत. तर, वनडे व टी20 क्रिकेटमध्ये मिळून तीन सामन्यात तीन बळी मिळवण्यात त्याला यश आले आहे. सहा फुटांपेक्षा जास्त उंची असलेला जेन्सन डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी तसेच उजव्या हाताने आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळताना देखील त्याने चमकदार कामगिरी करून दाखवली होती.
(Marco Jansen Won ICC Emerging Cricketer Of The Year 2022 Renuka Thakur In Womens Category)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: सूर्या बनला 2022 आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ द इयर; तीन दिग्गजांना मागे टाकत उमटवली मोहोर
BREAKING: आणखी एक आयसीसी पुरस्कार भारतात! रेणुका ठाकूर ठरली एमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर