दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघात सध्या दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंचुरीयन येथे पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 1 डाव आणि 45 धावांनी श्रीलंका संघावर विजय मिळवला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने दोन सामन्याच्या मालिकेत 1-0 या फरकाने आघाडी घेतली. या संघाचे प्रशिक्षक मार्क बाऊचर म्हणाले की कोरोना व्हायरसने गोलंदाजाच्या जीवनावर परिणाम केला आहे.
सध्या जगात सर्वत्र कोरोना व्हायरसचा हाहाकार पसरला आहे. त्यामुळे अशा कालावधीत सर्व काळजी घेऊन सामन्याचे आयोजन केले जात आहे. या महामारीचा खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व काळजी घेऊन सामन्याचे आयोजन केले जात आहे, परंतु काही ठिकाणी तरी सुद्धा खेळाडूंना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या जीवनावर याचा परीणाम झालेला दिसत आहे, यावर मार्क बाऊचर यांनी आपले मत मांडले आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक मार्क बाऊचर म्हणाले, “फलंदाजांच्या फिटनेसवर काम करणे सोपे आहे. कारण ते बर्याच प्रकारचे व्यायाम करू शकतात. मात्र सलग 20 षटके फेकणे अवघड आहे. गोलंदाजाना खेळाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण त्यांना सकाळी 10 षटके फेकल्यानंतर पुन्हा दुपारी 10 षटके फेकावी लागू शकतात. गोलंदाजांकडून केवळ ही अपेक्षा केली जावू शकत नाही की, फक्त 6 षटके फेकली जावी आणि विचार केला जाईल की ते कसोटी सामन्यासाठी तयार आहेत.”
प्रशिक्षक मार्क बाऊचर म्हणाले,” तुम्ही गोलंदाजांना फक्त 20 षटकापर्यंत गोलंदाजी करायला सांगू शकत नाही. मिकी आर्थर(श्रीलंका संघाचे प्रशिक्षक) विरुद्ध संघाचे प्रशिक्षक आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की आता आम्ही मित्र नाही. मी मिकी सोबत एक कोक पिऊन त्याच्याकडून काही शिकेल. ”
दक्षिण आफ्रिका संघाकडून दुसर्या डावात गोलंदाजी करताना लुंगी एंगिडी, एन्रीच नॉर्किए, मुल्डर आणि सिपाम्ला यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात 142.1 षटकात सर्वबाद 621 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये डू प्लेसिस याने सर्वाधिक 199 धावांची दीड शतकीय खेळी साकारली होती. त्याचबरोबर केशव महाराजने 73 धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडचा ‘हा’ गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर, पाय फ्रॅक्चर झाला असूनही केलं होतं गोलंदाजीचं धाडस
“मी तर केवळ फलंदाज अजिंक्य रहाणेला घडवलं, पण तो कर्णधार झाल्याचे श्रेय त्यालाच”
भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला कोरोनाचा फटका, २०२२ पर्यंत मालिका स्थगित