पहिल्या कसोटी सामन्यांच्या रंगतदार लढतीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत आहेत. गुरुवारपासून (७ जानेवारी) हा सामना सुरु झाला असून आज(८ जानेवारी) या सामन्याचा दुसरा दिवस आहे. यादिवशी दुसऱ्या सत्राखेर स्टिव्ह स्मिथच्या शतकी खेळीसह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावा केल्या आहेत. त्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरले आहेत. त्यांच्या फलंदाजीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे.
लॅब्यूशानेचा गिलला डिवचण्याचा प्रयत्न
झाले असे की, गिल फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्नस लॅब्यूशाने त्याच्याजवळ आला आणि त्याचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत होता. लॅब्यूशाने गिलला विचारले की, “तुझा आवडता खेळाडू कोण आहे?”. यावर गिल उत्तर देत म्हणाला की, “मी या प्रश्नाचे उत्तर तुला नंतर देईल.” अर्थातच सामना संपल्यानंतर तुला याला उत्तर मिळेल, असे गिलने लॅब्यूशानेला म्हटले.
त्यानंतर लॅब्यूशाने म्हणाला की, “सचिन? तू विराटला मानतो का?”. दरम्यान त्यांच्यातील संभाषणाचा आवाज स्टंप माईक्समध्ये कैद झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
लॅब्यूशाने आणि गिल यांच्यातील मजेशीर संवादाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला असल्याचे दिसत आहे. कित्येक नेटकऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वापरकर्त्याने तर, “हाच प्रश्न काही वर्षांनंतर लॅब्यूशानेला विचारा. त्यावेळी तो स्वत: त्याचा आवडता खेळाडू गिल असल्याचे सांगेल”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Marnus just wants to know who Gill's favourite player is! 😂 #AUSvIND pic.twitter.com/VvW7MixbQR
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
ask Marnus after few years, who's his favourite player..he might comes out with a name..Subman Gill !
— JD (@jnd583) January 8, 2021
लॅब्यूशानेने रोहितचीही केली विचारपूस
एवढेच नव्हे तर, लॅब्यूशानेने सामना चालू असताना रोहितशी देखील संवाद साधला. दुखापतीतून सावरल्यानंतर उशीरा ऑस्ट्रेलियाला आलेल्या रोहितला १४ दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करावा लागला होता. “या कालावधीत तू नक्की काय केलंस?”, असा गमतीशीर प्रश्न लॅब्यूशानेने रोहितला विचारला.
.@marnus3cricket was enjoying being back under the helmet for the Aussies! #AUSvIND pic.twitter.com/GaCWPkTthl
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
भारत- ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या सामन्याची आकडेवारी
भारत- ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्या. यात स्टिव्ह स्मिथच्या सर्वाधिक १३१ धावांचा समावेश होता. २२६ चेंडूंच्या मदतीने १६ चौकार ठोकत त्याने ही धावसंख्या गाठली. तसेच मार्नस लॅब्यूशानेनेही ९१ धावांची तूफानी खेळी केली. अष्टपैलू रविंद्र जडेजाने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या हातून त्याला झेलबाद केले. याव्यतिरिक्त ऑस्ट्रलियाचा पदार्पणवीर विल पुकोवस्की याने ६२ धावांचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजी करताना जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. दरम्यान शतकी खेळी केलेल्या स्मिथला त्याने धावबाद केले तसेच पदार्पणवीर नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना माघारी धाडले. तर मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : रोहित-गिलची चांगली सुरुवात; दुसऱ्या सत्राखेर भारताच्या बिनबाद २६ धावा
सिडनी कसोटीत स्टिव्ह स्मिथची जबरा फलंदाजी, शतकासह केली कोहलीची बरोबरी
स्मिथचा नादच खुळा! शतकी खेळी करत ‘या’ विक्रमाच्या यादीत विराटसह सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे