मागील दीड वर्षापासून कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅब्यूशाने आता आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक आहे. लॅब्यूशानेने आतापर्यंत 15 कसोटी सामन्यात 60.48 च्या सरासरीने 1512 धावा केल्या आहेत. 26 वर्षीय लॅब्यूशाने आता आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएल स्पर्धेचे तो बर्याच वर्षापासून निरीक्षण करत आहे. त्याला वाटते की, मागील 16 महिन्यांपासून आपल्या कारकिर्दीत तो पुढे सरकला आहे. त्याला आता आयपीएलची ओढ लागली आहे.
मला संधी मिळेल, तेव्हा आयपीएल खेळण्यासाठी आहे तयार
लॅब्यूशाने क्रिकबझसोबत बोलताना म्हणाला, “मला खूप दिवसांपासून आयपीएलबद्दल आवड होती. आयपीएल संघाचे अनुकरण करत आलो आहे. मी आयपीएलचा कोणताही हंगाम खेळण्यासाठी तयार आहे. मात्र, मला वाटते ती वेळ आता आली आहे. मला खेळण्याची जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तयार असेल. आणि मला वाटते तुम्ही ही गोष्ट नेहमी चालवण्याची गरज नाही.”
तो पुढे म्हणाला, “तुम्हाला माहित आहे की, मागील वर्षी ज्या प्रकारे कारकीर्द विकसित झाली आहे. ते खूप पुरेसे आहे. हे वास्तवात जलद आले. शक्यतो दीड वर्षापूर्वी, मी आयपीएलसाठी तयार नव्हतो. परंतु आता मी त्यामध्ये भाग घेणे पसंत करेल.”
बिग बॅश लीगमध्ये घेतला होता भाग
कसोटी क्रिकेटमध्ये लॅब्यूशानेने आपली गुणवत्ता आणि कौशल्य या दोन्हीचे प्रदर्शन केले आहे. परंतु त्याला लहान प्रकारात पूर्ण अनुभव नाही. या उजव्या हाताच्या फलंदाजाने टी-20 क्रिकेटच्या बिग बॅश लीगमध्ये 2016-17 साली खेळायला सुरुवात केली होती. त्याने यामध्ये फक्त 10 सामने खेळले आहेत. या स्पर्धेत खेळताना त्याने 97 च्या सरासरीने 97 धावा केल्या. मागील बिग बॅश लीगमध्ये त्याने ख्रिस लिनच्या नेतृत्त्वाखाली ब्रिसबेन हिट संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते.
परंतु सध्या बॉर्डर- गावसकर मालिकेत त्याने दोन्ही डावात 47 आणि 6 धावा काढल्या आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये एक अनुभवी खेळाडू म्हणून पुढे येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“..म्हणून त्यांना लक्ष्य करणे चुकीचे”; सुनील गावसकरांनी केली भारतीय फलंदाजांची पाठराखण
अजब योगायोग! १९ डिसेंबर ठरली भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील खास तारीख
दणदणीत विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केले गोलंदाजांचे कौतुक, म्हणाला…