टीम इंडियाने पर्थमध्ये शानदार विजयाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात केली. मात्र, कांगारूंनी ॲडलेडमध्ये पलटवार करत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता 14 डिसेंबरपासून गाबा येथे उभय संघांमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने टीम इंडियाला खास सल्ला दिला आहे.
मॅथ्यू हेडनने शनिवारपासून गाबा येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या आणि पाचव्या स्टंप लाइनमध्ये गोलंदाजी करावी. असा सल्ला दिला आहे. भारतीय गोलंदाजांनी गाबाच्या बूमचा फायदा घ्यावा, असेही तो म्हणाला.
ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज म्हणाला, “जेव्हा भारतीय गोलंदाजांना गब्बा येथे गोलंदाजी करण्याची संधी मिळते. तेव्हा त्यांनी चौथ्या आणि पाचव्या स्टंप लाईनवर अधिक अवलंबून राहावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघाला गाबाच्या उसळीचा फायदा घ्यावा लागेल. ब्रिस्बेनमधील कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाला सर्वात महत्वाचे आहे.”
तसेच त्याने भारतीय फलंदाजांना सावधपणे खेळण्यास सांगितले. हेडन म्हणाला, “भारताला ब्रिस्बेनमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. त्यांना किमान एक दिवस फलंदाजी करावी लागेल. कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसापेक्षा कमी फलंदाजी स्वीकार्य नाही. भारताने आव्हानात्मक परिस्थितीतही प्रथम फलंदाजी केली पाहिजे.”
मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने कांगारूंचा गाबा येथे 3 गडी राखून पराभव केला होता. चार वर्षांपूर्वी 2020 मध्ये टीम इंडियाने गाबामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. रिषभ पंत या सामन्याचा हिरो ठरला होता. ज्यात 1988 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघ या मैदानावर पराभूत झाला.
हेही वाचा-
शॉ, रहाणे आणि दुबेची आक्रमक खेळी, टी20 क्रिकेटमध्ये मुंबई संघाने रचला इतिहास
Birthday Special; युवराज सिंगचे 5 मोठे रेकॉर्ड जे आजही अभेद्य, आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी
या 3 कारणांमुळे अजिंक्य रहाणे आयपीएल 2025 मध्ये केकेआरचे नेतृत्व करु शकतो