टी२० मालिकेसाठी श्रीलंका संघ ऑस्ट्रेलिया (IND vs SL) दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या सामन्यात पाहुण्या संघाला ६ विकेटने पराभूत करत ५ सामन्यांची टी२० मालिका आपल्या नावावर केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर मॅक्सवेलला सामनावीराचा किताब देण्यात आला. या सामन्यानंतर श्रीलंकेचा महिश तिक्षाना हा चांगलाच चर्चेत आहे. कारण, या सामन्यात तो विचित्र पद्धतीने बाद झाला. त्याचा बाद होतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या आपल्या अधिकृत ट्विटर आकाऊंटवर शेअर केला आहे.
Quick thinking from Wade after Finch slowed it down! #OhWhatAFeeling#AUSvSL | @Toyota_Aus pic.twitter.com/yYSJMrq5hx
— cricket.com.au (@cricketcomau) February 18, 2022
श्रीलंका संघाच्या १९ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर ही घटना घडली. चमिका करुणारत्नेने कवरच्या दिशेने एक फटका मारला आणि धाव घेण्यासाठी वेगाने पळाला. चेंडू थेट कर्णधार फिंचच्या हातात गेला. त्याने स्ट्राइकरच्या बाजूला चेंडू फेकला. एकीकडे करुणारत्ने फटका खेळून वेगाने धावत असताना, नॉन स्ट्राइकवर उभ्या असलेल्या तिक्षाना करुणारत्नेची हाक ऐकू शकला नाही. त्यामुळे त्याने धावण्यास उशीर केला. फिंचने स्ट्राईकरच्या बाजूला फेकलेला चेंडू स्टंपला लागला नाही. यष्टिरक्षक मॅथ्यू वेड स्टंपच्या दिशेने धावला व त्याने चेंडू पकडला आणि डाइव करून स्टंपवर मारला.
तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय गेला आणि फलंदाज तिक्षाना क्रीजपर्यंत पोहचला नव्हता त्यामुळे तो बाद झाला. या सामन्यानंतर चाहत्यांनी फिंच आणि मॅथ्यू वेड यांचे कौतुक करत आहेत. तर तिक्षाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने २० धावांनी विजय मिळवला. दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. तिसरा आणि चौथा टी२० सामना ६ गडी राखुन जिंकला. तर मालिकेतील अखेरचा सामना जिंकून श्रीलंकेने व्हाईटवॉश टाळला.
महत्वाच्या बातम्या-