fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत मावळी मंडळ, शिवशंकर, गुड मॉर्निंग यांची विजयी सलामी.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बंड्या मारुती सेवा मंडळ, मुंबई अयोजिय राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेला कालपासून महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण केंद्र, ललित कला भवन, ना म जोशी मार्ग डीलाईल रोड, मुंबई येथे सुरुवात झाली.

गुड मॉर्निंग स्पो विरुद्ध वीर परशुराम मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यात ४३-१८ अशी गुड मॉर्निंग संघाने बाजी मारली. सुदेश खुले व स्वप्नील भादवणकर यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर २५-०९ अशी आघाडी गुड मॉर्निंग संघांने मिळवले होती. चेतन पालवनकर ने एकाकी झुंज दिली.

Photo Courtesy: Dinesh Ghadioankar

मावळी क्रीडा मंडळ विरुद्ध चेंबूर क्रीडा मंडळ याचात झालेल्या सामन्यांत मावळी मंडलने मध्यंतरा पर्यत २२-१४ अशी आघाडी मिळवली होती. मेघराज खांबे व निशिकांत पाटील यांच्या आक्रमक चढायानी व साहिल बामणे च्या बचावाचा खेळांवर मावळी मंडळाने ४८-२६ असा विजय मिळवला.

Photo Courtesy: Dinesh Ghadioankar

सुनील स्पोर्टस विरुद्ध उजाळा क्रीडा मंडळ यांच्यात चांगली लढत बघायला मिळाली. १०-१० अश्या मध्यंतरापर्यत असलेल्या सामना उत्तराधत ही चुरशीचा झाला. अंतिम काही मिनिट शिल्लक असताना मिळवलेला सुपर टॅकल व बोनस गुण उजाला मंडळाच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले. ३६-३२ असा विजय मिळवला. तहा शेख व शुभम पाटील चढाईत उत्कृष्ट खेळ केला.

Photo Courtesy: Dinesh Ghadioankar

शिवशंकर विरुद्ध उत्कर्ष मंडळ याच्यात झालेल्या लढतीत शिवशंकर संघाने ३४-१७ असा एकतर्फी विजय मिळवला. श्रीकांत जाधव व गणेश जाधव यांनी चढाईत चौफेर खेळ केला. तर तुषार भोईर व सूरज बनसोडे यांनी चांगला बचावफळी सांभाळली. स्वास्तिक क्रीडा मंडळाने गोल्फादेवी संघावर ३५-१८ असा सहज विजय मिळवला. २१ संघांनी सहभाग घेत असलेल्या यास्पर्धेत ७ गटात विभाजन केले आहे.

You might also like