ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आपल्या विस्फोटक अंदाजासाठी ओळखला जातो. जगातल्या आक्रमक फलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाला आपल्या दमावर अनेक सामने एकतर्फी जिंकून दिले आहेत. मॅक्सवेल इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा भाग आहे. आयपीएलच्या या हंगामात मॅक्सवेलने गोलंदाजांची पळता भुई थोडी केली होती. परंतु आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तयारी करीत असलेल्या भारतीय संघावर आता मॅक्सवेल नावाचं वादळ घोंगावतंय. कारण या अंतिम सामन्यासाठी न्युझीलंड संघाकडून मॅक्सवेल मैदानावर उतरणार आहे.
वास्तविक, ज्या मॅक्सवेलसंबंधी आम्ही बोलतोय तो ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल नसून न्युझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज थॉमस विल्यम मॅक्सवेल लाथम म्हणजेच टॉम लाथम आहे. 18 जूनला मैदानात उतरण्याऱ्या भारतीय संघासमोर न्युझीलंडच्या या आक्रमक फलंदाजाला रोखण्याचे आव्हान असेल. लाथमने आपले कसोटी पदार्पण फेब्रुवारी 2014 साली भारतीय संघाविरुद्धच केले होते. त्या सामान्यात त्याने 29 आणि 0 धावा केल्या होत्या. त्याने आतापर्यंत भारतीय संघाविरुद्ध 6 कसोटीत 31.36 च्या सरासरीने 345 धावा केल्या आहेत.
लाथमच्या करकीर्दीवर एक नजर-
न्युझीलंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम लाथमने 57 कसोटी सामन्यांत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्याने 42.24 च्या शानदार सरासरी, 11 शतक आणि 20 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 3988 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 264 धावा आहेत.
त्याव्यतिरिक्त न्युझीलंडकडून खेळलेल्या 102 वनडे सामन्यांत त्याने 34.02 च्या सरासरीने 2824 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश होतो. लाथमने 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामने देखील खेळले आहे. परंतु त्यामध्ये त्याने 16.30 च्या साधारण सरासरीने फक्त 163 धावाच केल्या आहेत.
आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लाथम 124 सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने एकूण 8600 धावा केल्या आहेत. तसेच 179 लिस्ट ए सामन्यांत त्याने 5173 धावा तर 77 टी20 सामन्यांत त्याने 1790 धावा केल्या आहेत.
त्यामुळे या खेळाडूला वेळीच आवर घातला नाही तर हा फलंदाज भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना 18 जून ते 22 जून दरम्यान साउथम्पटन येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फिरकीपटू अश्विनला ‘हा’ खतरनाक चेंडू टाकण्यास पाहिजे परवानगी, भज्जीचा होता त्यात हातखंडा
भारत-श्रीलंका मालिकेसाठी निवड न झाल्याने ‘हा’ धुरंधर दु:खी, ठोकलीत २७ शतके
माजी क्रिकेटपटूने निवडला भारत-पाकिस्तान खेळाडूंचा ‘सर्वकालिन टी२० संघ’, पाहा कोणाला बनवले कर्णधार