शुक्रवारी(27 नोव्हेंबर) भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 66 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यानंतर भारताचा केएल राहुल आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल हे आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणारे खेळाडू जोरदार ट्रोल झाले होते.
ट्रोल होण्यामागील कारण असे की राहुल पंजाबचा कर्णधार होता आणि मॅक्सवेल आयपीएलच्या 13 व्या हंगामात पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला आयपीएलमध्ये एकही षटकार मारता आला नव्हता. मात्र या हंगामानंतर ऑस्ट्रेलियाकडून खेळताना मॅक्सवेलने तुफानी खेळी केली. त्याने भारताविरुद्ध 19 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळी त्याने 5 चौकार व 3 उत्तुंग षटकार मारले.
मॅक्सवेल ही खेळी करत असताना राहुल यष्टीरक्षण करत होता. याच कारणामुळे राहुल आणि मॅक्सवेल ट्रोल होत आहेत. पण आता मॅक्सवेलने राहुलची माफी मागितली असल्याचे सांगितले आहे
निशामही झाला ट्रोल –
शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघातही पहिला टी20 सामना झाला. त्या सामन्यात न्यूझीलंडकडून जिमी निशामने 24 चेंडूत 48 धावांची नाबाद खेळी केली होती. निशामही आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळला आणि तोही या आयपीएल हंगामात खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे तो देखील ट्रोल झाला.
या सामन्यानंतर एका चाहत्याने निशाम, मॅक्सवेल आणि राहुलला ट्रोल करणारे मीम सोशल मीडियावर शेअर केले होते. या मीममध्ये केएल राहुलचा चेहरा लावलेला एक व्यक्ती निराशेने उभा आहे. तसेच त्या चाहत्याने लिहिले आहे की ‘निशाम आणि मॅक्सवेलला त्यांच्या राष्ट्रीय संघाकडून दमदार खेळी करताना पाहून केएल राहुल.’
चाहत्याच्या या मीमवर निशामने मॅक्सवेलला टॅग करत उत्तर दिले की ‘हाहाहा हे खरंच खूपच छान आहे.’
Hahaha that’s actually pretty good @Gmaxi_32 ???? https://t.co/vsDrPUx58M
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) November 28, 2020
मॅक्सवेलने मागितली राहुलची माफी
निशामच्या या उत्तरावर मॅक्सवेलनेही प्रतिक्रिया दिली. मॅक्सवेलने म्हटले की ‘मी फलंदाजी करत असताना त्याची (राहुलची) माफी मागितली.’ मॅक्सवेलने पुढे हसण्याचा इमोजीही टाकला आहे.
I apologised to him while I was batting ???? ???? ???? #kxipfriends ❤️
— Glenn Maxwell (@Gmaxi_32) November 28, 2020
आयपीएल 2020 मधील पंजाबची कामगिरी निराशाजनक –
पंजाबला 2020 मध्ये 14 सामन्यांपैकी 8 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ते गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर राहिले. असे असले तरी या हंगामात केएल राहुलची बॅट मात्र चांगलीच तळपली. त्याने या हंगामात सर्वाधिक 670 धावा करताना ऑरेंज कॅपही पटकावली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ दोघांना मिळणार भारतीय संघातून डच्चू? मुंबईकर खेळाडूची लागणार वर्णी
विराट इतका बिझी कोणीच नाही! दहा वर्षात खेळला ‘इतके’ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट