IPLक्रिकेटखेळाडूटॉप बातम्या

बापरे बाप.. हा वेग आहे की मस्करी..! 21 वर्षीय मयंक यादवने टाकला IPL 2024 च्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू – पाहा व्हिडिओ । Mayank Yadav Fastest Ball Video

Mayank Yadav Fastest Ball Video : लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज संघात काल (दि. 31) आयपीएलचा 11वा सामना झाला. लखनऊ संघाच्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने दमदार सुरुवात केली होती. पंजाब काही चेंडू राखून हा सामना जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण कर्णधार केएल राहुलने मोक्याच्या वेळी आपल्या ताफ्यातील ‘धडाडती तोफ’ बाहेर काढली आणि सामन्याचा निकाल आपल्या बाजूने फिरवला. ( Mayank Yadav LSG Pacer Bowled Fastest Delivery of IPL 2024 on Debut Picked 3 Wickets Vs PBKS )

पंजाब विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने आपल्या संघातील 21 वर्षीय खेळाडू मयंक यादवला पदार्पणाची संधी दिली. मयंकने देखील पदार्पणाच्या संधीचे सोने केले. इतकेच नाही तर कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडील गोलंदाजी करत पंजाबच्या खेळाडूंची त्रेधातिरपट उडवली. एकामागोमाग एक वेगवान चेंडू टाकत पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडले आणि सामना लखनऊच्या बाजूने झुकवला. या सामन्यात मयंकने 4 षटकात 3 बळी घेतली आणि तो सामनावीर ठरला. परंतू या वेगवान गोलंगदाजाने सामन्यात अनेक रेकॉर्डही केले.

पदार्पणाच्या सामन्यातच मयंक यादवने आपल्या गोलंदाजीतील वेगाने सर्वांना चकीत केले आहे. इतकेच नाही तर त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकून खळबळ उडवून दिली आहे. मयंक यादवने त्याच्या दुसऱ्याच षटकात या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकलाय. या युवा वेगवान गोलंदाजाने ताशी 155.8 किमी वेगाने चेंडू टाकला. यापूर्वी त्याने पहिल्याच षटकात 150 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. यासह तो विक्रमांच्या यादीत सामील झाला आहे.

आयपीएलमधील सर्वांत वेगवान चेंडू आणि गोलंदाज –
शॉन टौट – 157.71 KMPH
लॉकी फर्ग्युसन – 157.3 KMPH
उमरान मलिक – 157 KMPH
एनरिक नॉर्किया – 156.2 KMPH
मयंक यादव – 155.8 KMPH

अधिक वाचा –
– सलग दोन षटकार अन् तिसऱ्या चेंडूवर चारी मुंड्या चीत! स्टॉइनिस विरुद्ध राहुल चहरचा जोरदार कमबॅक
– केएल राहुलचा प्लॅन फसला, अर्शदीपच्या जाळ्यात अडकून स्वस्तात बाद
– पूरन-क्रुणालची तुफानी फटकेबाजी, पंजाबसमोर विजयासाठी 200 धावांचं लक्ष्य

Related Articles