पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत मेफ्लाईंग हॉक्स संघाचा बाद फेरीत प्रवेश

पुणे। पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत फ्लाईंग हॉक्स संघाने कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा 40-34 असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरी फ्लाईंग हॉक्स संघाने कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा 40-34 असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. 10 वर्षाखालील मुलांच्या गटात सक्षम भन्साली याने नील केळकरचा 4-3 असा पराभव करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. 12वर्षाखालील मुलांच्या गटात तेज ओकने शिवम पाडीयाचा 6-0 असा तर मुलींच्या गाटत अंजली निबाळकरने खुशी पाटीलचा 6-0 असा सहज पराभव करत संघाला आघाडी मिळवून देत संघाचा डाव बळकट केला. 14वर्षाखालील मुलांच्या गटात सुधांशू सावंतने ऋषिकेश बर्वेचा 6-0 असा पराभव केला.

कुमार दुहेरी गटात पार्थ देवरूखकर व साईराज शोत्री या जोडीने प्रणव इंगोळे व रेन मुजगुले यांचा 6-1 असा तर 14 वर्षाखालील दुहेरी गटात तनिष बेलगलकर व श्लोक गांधी यांनी वेदांत ससाने व अथर्व जोशी यांचा 5(3)-6 असा टायब्रेक मध्ये पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

साखळी फेरी:

फ्लाईंग हॉक्स वि.वि कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स: 40-34
एकेरी:
8 वर्षाखालील मिश्र गट: सृष्टी सुर्यवंशी पराभूत वि श्रावी देवरे 3(5)-4;
10 वर्षाखालील मुले: सक्षम भन्साली वि.वि नील केळकर 4-3;
10वर्षाखालील मुली: जसलीन कटरिया पराभूत वि मृणाल शेळके 0-4;
12वर्षाखालील मुले: तेज ओक वि.वि शिवम पाडीया 6-0;
12वर्षाखालील मुली: अंजली निबाळकर वि.वि खुशी पाटील 6-0;
14वर्षाखालील मुले: सुधांशू सावंत वि.वि ऋषिकेश बर्वे 6-0;
14वर्षाखालील मुली: कौशिकी सामंत पराभूत वि रुमा गायकैवारी 1-6;
कुमार दुहेरी गट: पार्थ देवरूखकर/साईराज शोत्री वि.वि प्रणव इंगोळे/रेन मुजगुले 6-1 ;
14 वर्षाखालील दुहेरी गट: तनिष बेलगलकर/श्लोक गांधी वि.वि वेदांत ससाने/अथर्व जोशी 5(3)-6;
10 वर्षाखालील दुहेरी गट: निव गोईल/देव गुहालेवाला पराभूत वि आर्यन किर्तने/संमिहन देशमुख 1-4;
मिश्र दुहेरी गट: एंजल भाटिया/चिराग चौधरी पराभूत वि डेलिशा रामघट्टा/आरूष मिश्रा 2-6

You might also like

Leave A Reply