Loading...

पीवायसी चॅलेंजर करंडक: एमसीए संयुक्त जिल्हा संघाचा पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीत तिसऱ्या दिवशी अनुपम संकलेचा याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एमसीए संयुक्त जिल्हा संघाने पहिल्या डावाच्या अधिक्याच्या जोरावर एमसीए संयुक्त क्लब संघाविरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Loading...

एमसीए गहुंजे क्रिकेट मैदानावरील तीन दिवसीय लढतीत आज तिसऱ्या दिवशी एमसीए संयुक्त जिल्हा संघाच्या दुसऱ्या डावापासून सुरुवात झाली. फलंदाजी करताना एमसीए संयुक्त जिल्हा संघाने 64.1 षटकात 194 धावा केल्या. यामध्ये अंकित बावणे 38, स्वप्निल चव्हाण 26, अनुपम संकलेचा 35, तनिश जाधव 26, मनोज इंगळे 21, विशांत मोरे 13 यांनी धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. एमसीए संयुक्त क्लबकडून सुदीप फाटक 19-65-4, मोईन बागवान 12.1-46-2, शुभम कोठारी 19-36-2)यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात एमसीए संयुक्त क्लब संघाने आज दिवसअखेर 20.1 षटकात 4 बाद 109धावा केल्या. यात अमेय सोमण 45(40,7×4,1×6), ओंकार खाटपे 36(33), रोहित करंजकर 13यांनी धावा केल्या. सामना अनिर्णित राहिल्यामुळे एमसीए संयुक्त जिल्हा संघाने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: बाद फेरी:

एमसीए गहुंजे क्रिकेट मैदान: पहिला डाव: एमसीए संयुक्त जिल्हा संघ: 87षटकात 7बाद 369धावा(विषांत मोरे 53(88,10×4,1×6), तनिश जाधव 49(103,8×4), अंकित बावणे 45(71,5×4,1×6), मेहुल पटेल 40, रंजित निकम नाबाद 78(97,6×4,5×6), अनुपम संकलेचा नाबाद 73(59,8×4,2×6), शुभम कोठारी 25-76-3, सुदीप फाटक 10-32-1)वि.एमसीए संयुक्त क्लब संघ. 40षटकात सर्वबाद 192धावा(ओंकार खाटपे 55(69,7×4,1×6), रामकृष्णा घोष 55(62,10×4), अक्षय काळोखे 33, अनुपम संकलेचा 5-30, मनोज इंगळे 3-32); एमसीए संयुक्त जिल्हा संघाकडे पहिल्या डावात 177 धावांची आघाडी;

दुसरा डाव: एमसीए संयुक्त जिल्हा संघ: 64.1 षटकात सर्वबाद 194 धावा(अंकित बावणे 38, स्वप्निल चव्हाण 26, अनुपम संकलेचा 35, तनिश जाधव 26, मनोज इंगळे 21, विशांत मोरे 13, सुदीप फाटक 19-65-4, मोईन बागवान 12.1-46-2, शुभम कोठारी 19-36-2) वि. एमसीए संयुक्त क्लब संघ: 20.1 षटकात 4 बाद 109धावा(अमेय सोमण 45(40,7×4,1×6), ओंकार खाटपे 36(33), रोहित करंजकर 13, जगदीश झोपे 5-40-3);सामना अनिर्णित; एमसीए संयुक्त जिल्हा संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी; सामनावीर-अनुपम संकलेचा.

Loading...
Loading...
You might also like
Loading...