Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेस्सीने रचला इतिहास! सामना संपण्यास 1 मिनिट असताना मार्टिनेझच्या भन्नाट सेव्हने अर्जेंटिना सुपर 8मध्ये

मेस्सीने रचला इतिहास! सामना संपण्यास 1 मिनिट असताना मार्टिनेझच्या भन्नाट सेव्हने अर्जेंटिना सुपर 8मध्ये

December 4, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
Emiliano Martinez Save vs AUS and Messi & Julián Álvarez

Photo Courtesy: Twitter/FIFA World Cup


कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये (FIFA World Cup) आतापर्यंत बाद फेरीचे दोन सामने खेळले गेले. यातील दुसरा सामना रविवारी (4 डिसेंबर) भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ARGvsAUS)सामना रंगला. हा सामना अहमद बिन अली स्टेडियममध्ये खेळण्यात आला. ज्यामध्ये अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मेस्सीची ऐतिहासिक कामगिरी
या सामन्यात अर्जेंटिनाचा स्टार लियोनल मेस्सी (Lionel Messi) याने इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो त्याच्या कारकिर्दीतील 1000वा सामना खेळत होता. त्याचबरोबर तो अर्जेंटिनाकडून विश्वचषकात सर्वाधिक गोल (9) करणारा खेळाडू ठरला. त्याने दिग्गज दिएगो मॅरडोना यांना मागे टाकले. त्यांनी विश्वचषकात 8 गोलो केले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने 35व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर त्याने विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या यादीत पोर्तुगलचा क्रिस्तियानो रोनाल्डो याला मागे टाकले आहे आणि अर्जेंटिनाला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

Leo Messi + Julian Alvarez = GOALS 🔥

Watch the highlights from Argentina's win over Australia for free on FIFA+ now! 👇

— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 3, 2022

मेस्सीने पहिल्यांदाच नॉकआऊटमध्ये केला गोल
मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत अर्जेंटिना, बार्सिलोना क्लब आणि पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) क्लब यांच्याकडून खेळताना एकूण 789 गोल आणि 338 असिस्ट केल्या आहेत. तसेच त्याने विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाचा बाद फेरीत गोल केला आहे.

🇦🇷 The Quarter-finals await…#FIFAWorldCup | #Qatar2022 pic.twitter.com/S7EKoQ4GVB

— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 3, 2022

पेलेनंतर कुओल सर्वात युवा खेळाडू
ऑस्ट्रेलियाचा गरंग कुओल यानेही ऐतिहासिक कामगिरी केली. तो 1958नंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. कुओलचे वय 18 वर्ष 79 दिवस होते. त्याच्याआधी 1958मध्ये ब्राझीलचे दिग्गज पेले यांनी हा विक्रम केला होता. त्यांनी 17 वर्ष 249 दिवस वय असताना विश्वचषकाच्या बाद फेरीचा सामना खेळला होता.

Argentina secure their spot in the Quarter-finals! 👏@adidasfootball | #FIFAWorldCup

— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 3, 2022

दुसऱ्या सत्रातही अर्जेंटिनाने आक्रमक खेळ प्रदर्शित केला आणि 57 व्या मिनिटाला गोल करत मजबूत आघाडी घेतली. हा गोल जुलियन अल्वारेज याने केला. मात्र 20 मिनिटांनी एंजो फर्नांडिस याने गोल करत सामना 2-1 असा केला. 97व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाकडे सामना बरोबरीत करण्याची संधी होती, मात्र एमिलियानो मार्टिनेझ (Emiliano Martinez) याने उत्तम बचाव केला आणि अर्जेंटिनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

This save by Emiliano Martinez sends Argentina to the quarter finals. pic.twitter.com/kyWg1EZiXQ

— Roy Nemer (@RoyNemer) December 3, 2022

या स्पर्धेतील पहिला बाद फेरीचा सामना नेदरलॅंड्स विरुद्ध अमेरिका यांच्यात झाला. त्यामध्ये नेदरलॅंड्सने 3-1ने विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. आता उपांत्यपूर्ल फेरीचा पहिला सामना 9 डिसेंबरला अर्जेंटिना विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात खेळला जाणार आहे. Messi made history & brilliant save by Emiliano Martinez puts Argentina in Super 8 FIFA World Cup 2022

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पेलेंसाठी प्रार्थना करा! फुटबॉल सम्राटाची प्रकृती खालावली; उपचारांना देत नाही प्रतिसाद
‘त्याच्यात जडेजाची जागा घेण्याची क्षमता’; भारतीय दिग्गजाने गायले युवा अष्टपैलूचे गुणगान


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

वाढदिवस विशेष- क्रिकेटर अजित आगरकर

Photo Courtesy: Twitter/ICC

...आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली

Ajit-Agarkar

गोष्ट एका क्रिकेटरची भाग 18: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित आगरकर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143