पुणे। पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाने इन्टेंसिटी टेनिस अकादमी रायजिंग इगल्स संघाचा 40-36 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरी मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाने इन्टेंसिटी टेनिस अकादमी रायजिंग इगल्स संघाचा 40-36 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 10 वर्षाखालील मुलांच्या गटात शार्दूल खवलेने वरद उंद्रेचा 4-0 असा तर मुलींच्या गटात स्वानीका रॉयने आरोही देशमुखचा 4-2 असा पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली.
12 वर्षाखालील मुलांच्या गटात अव्दिक नाटेकरने पृथ्विराज हिरेमठ याचा 6-2 असा पराभव केला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्णव कोकणेने अनन्मय उपाध्याय याचा 6-0 असा तर मुलींच्या गटात संहीता नगरकरने सानिका लुकतुकेचा 6-3 असा पराभव केला.
कुमार दुहेरी गटात जय पवार व जश शहा यांनी दिव्यांक कवितके व पार्थ काळे यांचा 6-3 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
मेट्रोसिटी रेजिंग बुल्स वि.वि इन्टेंसिटी टेनिस अकादमी रायजिंग इगल्स: 40-36
एकेरी:
8 वर्षाखालील मिश्र गट: निल देसाई पराभूत वि स्मित उंद्रे 2-4;
10 वर्षाखालील मुले: शार्दूल खवले वि.वि वरद उंद्रे 4-0;
10वर्षाखालील मुली: स्वानीका रॉय वि.वि आरोही देशमुख 4-2;
12वर्षाखालील मुले: अव्दिक नाटेकर वि.वि पृथ्विराज हिरेमठ 6-2;
12वर्षाखालील मुली: प्रिशा शिंदे पराभूत वि देवांशी प्रभुदेसाई 1-6;
14वर्षाखालील मुले: अर्णव कोकणे वि.वि अनन्मय उपाध्याय 6-0;
14वर्षाखालील मुली: संहीता नगरकर वि.वि सानिका लुकतुके 6-3;
कुमार दुहेरी गट: जय पवार/ जश शहा वि.वि दिव्यांक कवितके/पार्थ काळे 6-3;
14 वर्षाखालील दुहेरी गट: शौर्य राडे/देवेन चौधरी पराभूत वि आर्यन हुड/ अनिश रांजळकर 1-6;
10 वर्षाखालील दुहेरी गट: अथर्व येलभर/आरूष देशपांडे पराभूत वि शौर्य घोडके/अहान सारस्वत 0-4;
मिश्र दुहेरी गट: नितिशा देसाई/आदित्य ठोंबरे पराभूत वि राजलक्ष्मी देसाई/शिवतेज शिरफुले 4-6