ऍडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२०-२१ मध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटीत भारतीय संघ ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. यानंतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी भारतीय संघासाठी लाजिरवाण्या मालिका पराभवाची भविष्यवाणी केली होती. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने सुद्धा भविष्यवाणी केली होती की, कसोटी इतिहासामध्ये ऍडलेड कसोटीत सर्वात कमी धावसंख्येवर संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाचा व्हाईटवॉश नक्की होता. मात्र, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकली होती.
भारतीय फिरकीपटू आर अश्विनसोबत (R Ashwin) त्याच्या युट्यूब चॅनेलवर झालेल्या संभाषणात वॉन म्हणाला होता की, “मला ऑस्ट्रेलियाला थोडे मागे जाताना पाहायला आवडेल आणि तुम्ही हे केले आणि मग हा सामना ड्रॉ केला. ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया पराभूत झाली नाही. शेवटच्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करणे म्हणजे मला वाटते की, हा तुमच्यासाठी सर्वोत्तम कसोटी मालिका विजय आहे.”
वॉन पुढे म्हणाला, “ब्रिस्बेनमधील शेवटचा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला जो काही गोंधळ सहन करावा लागला, जिथे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला नाही आणि रिषभसाठी अशा प्रकारे खेळणे खास होते. खूप, खूप खास, ती मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाला हरवणारा कोणताही संघ माझ्यासाठी नेहमीच चांगला संघ असतो.”
“ऍडलेड पराभवानंतर कोहली आपल्या मुलीच्या जन्मावेळी भारतात आला. नंतर अनेक खेळाडू जखमी झाले. त्यामुळे व्यवस्थापनाला पुढील दोन कसोटींसाठी अनुभवी क्रिकेटपटूंची निवड करावी लागली. दुखापतग्रस्त हनुमा विहारी आणि अश्विन यांनी भारताला सिडनीमध्ये मोठा विजय मिळवून दिला.”
“गेल्या वर्षी जेव्हा तुम्ही ऍडलेडमध्ये बाद झालात, तेव्हा मी एक विधान केले होते. मग अचानक तुम्ही ती मालिका जिंकण्यासाठी अविश्वसनीयपणे परत आलात. कठीण परिस्थिती होती, विराट मायदेशी जात होता आणि त्यानंतर अजिंक्यच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीतून बरेच संघ परत आलेले नाहीत.”
“माझ्यासाठी मागील १० किंवा १५ वर्षांतील सर्वात मोठा कसोटी मालिका विजय होता, जो सर्व खेळाडू बाहेर गेल्यानंतर मी पाहिलेला होता. तो स्पष्टपणे कोरोनाचा काळ होता. जखमा होत्या, पण सिराजने जादू केली. तुम्ही तिथे राहिला आणि सिडनीमध्येही टीम पेनसोबत थोडी मजा केली, त्याची मजा घेतली,” असे सुद्धा वॉन म्हणाला.
या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना खिशात घातला होता, तर दुसरा कसोटी सामना भारताने आपल्या नावावर केला होता. त्यानंतर तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि चौथ्या कसोटीत पुन्हा भारतीय संघाने विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy: तमिळनाडूसाठी जुळ्या भावांचा एकत्रच शतकी दणका, तर दिग्गजांकडून निराशा
‘या’ राज्यात सुरू होतेय देशातील पहिलीच महिला क्रिकेट अकादमी, विनाशुल्क पुरवल्या जातील सुविधा