Loading...

पाकिस्तानने प्रशिक्षकपदावरुन काढल्यानंतर आता मिकी आर्थर या संघाला करणार मार्गदर्शन

मिकी आर्थर यांची श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांचा पहिला दौरा पाकिस्तानचा असेल.

Loading...

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीपर्यंत आर्थर हे पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याना काढून टाकले आहे आणि मिस्बाह- उल- हक यांना मुख्य निवडकर्ता आणि प्रमुख प्रशिक्षक अशी दुहेरी जबाबदारी सोपवली आहे.

आर्थरच्या काळात ग्रँट फ्लॉवर हा पाकिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक होता. आता ते श्रीलंकेच्या संघासाठी काम करतील.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 11 डिसेंबरपासून रावळपिंडी येथे खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना कराची येथे होईल.

Loading...

आर्थर यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. फ्लॉवरला केवळ वनडे आणि टी20 संघांचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कसोटी सामन्यात आर्थरच ही जबाबदारी सांभाळेल.

आर्थर हे क्रिकेटविश्वामधील एक अनुभवी प्रशिक्षक आहेत. 2005 ते 2010 पर्यंत ते दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.  आर्थर हे ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षकही राहिले आहेत.

तसेच ते पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक असताना त्यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानने चॅम्पियन्स करंडक जिंकला आणि पाकिस्तान आयसीसी क्रमवारीत टी20 मध्ये अव्वल क्रमांकावर विराजमान झाला. मात्र विश्वचषक 2019 मध्ये पाकिस्तान संघाने खराब कामगिरी केल्यामुळे  आर्थर यांना काढून टाकण्यात आले.

Loading...

आर्थर आणि फ्लॉवर दोघांनीही सुमारे तीन वर्षे पाकिस्तान संघाला प्रशिक्षण दिले आहे. म्हणूनच, या संघाच्या सामर्थ्य व कमकुवतपणाची जाणीव त्यांना आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानला श्रीलंकेने मायदेशात टी20 मालिकेत पराभूत केले होते.

तसेच नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात पाकिस्ताने टी20 आणि कसोटी मालिकेत पराभव स्विकारला आहे.

You might also like
Loading...