पाकिस्तान संघाचे क्रिकेट संचालक मिकी आर्थर यांनी पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरवर मोठी प्रतिक्रिया दिसी आहे. पाकिस्तान संघाचे क्रिकेट संचालक मिकी आर्थर यांनी आमिरचे खूप कौतुक केले आहे. ते म्हणाला की, “आमिर अजूनही मॅचविनर आहे आणि तो जबरदस्त गोलंदाज आहे.”
मिकी आर्थर (Mickey Arthur) पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना त्यांनी गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) वर खूप विश्वास व्यक्त केला होता. त्यांनी आमिरला सतत संधी दिली आणि आमिरनेही चांगली कामगिरी केली. भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 ची फायनल जिंकण्यात मोहम्मद अमिरचा मोलाचा वाटा होता. मात्र, आमिर गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तान संघातून बाहेर आहे.
मिकी आर्थर हे काऊंटी क्रिकेटमधील डर्बीशायर संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्या संघाने 2024 हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी आमिरला परदेशी खेळाडू म्हणून करारबद्ध केले आहे. यादरम्यान मिकी आर्थरने मोहम्मद आमिरचे खूप कौतुक केले.
आमिर बद्दल बोलताना मिकी म्हणाले की, “मोहम्मद अमिरला संघात घ्यायचे कारण अगदी सोपे आहे. तो अजूनही जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तो चेंडू उत्तम स्विंग करतो. आमिर सामना जिंकवणारा खेळाडू आहे. आम्हाला आमिरसारख्या वेगवान गोलंदाजाची गरज होती आणि तो आमच्या संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.”
मिकी आर्थर ज्या प्रकारे मोहम्मद आमिरला सपोर्ट करतो, त्यामुळे आमिरच्या चाहत्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे की, आमिर पुन्हा पाकिस्तानी संघात पुनरागमन करू शकतो का? मात्र, आशिया चषकासाठी जाहीर झालेला संघ पाहता मोहम्मद आमिर विश्वचषकापर्यंत पाकिस्तान संघात पुनरागमन करू शकेल, असे वाटत नाही. आमिर सध्या जगभरातील T20 लीगमध्ये खेळत आहे. (mickey arthur statment about mohammad amir before world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
रोहितने सुरू केली आशिया चषकासाठी जोरदार तयारी, जिममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानचा युवा फलंदाज करणार विराट-बाबरची बरोबरी! माजी कर्णधाराचे माठे वक्तव्य