इंडियन प्रीमियर लीगची रॉयल चॅलेंजर्स फ्रँचायझी काही महत्वाचे बदल करणार आहे. आरसीबी संघ व्यवस्थापनाने आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीचे डायरेक्टर मायक हेसन आणि मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांना संघाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आगामी आयपीएल हंगामात नव्या सपोर्ट स्टाफसह मैदानात उतरणार आहे. यासाठी फ्रँचायझी येत्या काही दिवसांमध्ये नवीन सपोर्ट स्टाफची घोषणाही करू शकते. माहितीनुसार मुक्य प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) आणि संघाचे डायरेक्टर माईक हेसन (Mike Hesson) यांना करारातून मुक्त केले आहे. संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक ऍडम ग्रिफिथ (Adam Griffith) यांच्याबाबत मात्र संघ व्यवस्थापनाने अद्याप निर्णय घेतला नाही, असेच दिसते.
सेहन आणि बांगलार मागच्या पाच वर्षांपासून आयसीबीसोबत काम करत होते. आरसीबीचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्याशी या दोघांचे चांगले संबंध असल्याचेही बोलले जाते. या दोघांनी संघाची साथ सोडल्यानंतर आता फ्रँचायझी नवीन कल्पना घेऊन येणाऱ्या आणि संघाला पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्यास पात्र असणाऱ्या उमेदवारांचा या पदासाठी विचार करत आहे. मुख्य प्रशिक्षकपदी फ्रँचायझी एखाद्या भारतीयाचा निवड करणार की विदेशी दिग्गजाला संधी देणार, हे पाहण्यासारखे असेल. मागच्या वर्षी फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वातील आरसीबी संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नव्हता. या सुमार प्रदर्शनामुळे चाहत्यांमध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफविषयी प्रचंड नाराजी पाहायला मिळाली होती. अशात नवीन सपोर्ट स्टाफकडून असणाऱ्या अपेक्षा देखील जास्तच असणार आहेत.
दरम्यान, आयपीएलमधील इतर संघांनीही आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज आणि प्रशिक्षक जस्टीन लँगर यांना आपल्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. मागच्या आयपीएल हंगामापर्यंत अँढी फ्लॉवर लखनऊचे मुख्य प्रशिक्षक होते. पण आगामी हंगामात तो दुसऱ्या एखाद्या आयपीएल संघाला मार्गदर्शन करताना दिसू शकतात. लँगर मागच्या काही दिवसांपासून दुसऱ्या फ्रँचायझीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. (Mike Hesson and Sanjay Bangar won’t be part of RCB now. )
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियावर नामुष्की! प्रथमच बांगलादेशकडून स्वीकारावा लागला लाजिरवाणा पराभव
यश धूल आणि विराटमध्ये जबरदस्त बॉन्डिंग! स्वतः भारतीय कर्णधाराने केला खुलासा