पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरूवारी (दि. 3 नोव्हेंबर) गोळीबार झाला. पंजाब प्रांतात एका विरोध यात्रेत ते त्यांच्या कंटेनर ट्रकमध्ये असताना त्याच्यावर गोळीबार झाला. यानंतर चाहत्यांनी भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये न पाठवण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरूवारी (दि.3 नोव्हेंबर) पंजाब प्रांतात गोळीबार झाला. गोळीबार झाला तेव्हा ते त्यांच्या कंटेनर-ट्रकमध्ये एका यात्रेत होते. या गोळीबारात त्यांच्या पायावर गोळी लागली. पाकिस्तानच्या आजी आणि माजी खेळाडूंनी या हल्ल्याचा कडवा निषेध केला. मात्र, ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी अत्यंत वाईट बातमी आहे. 2009मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे काही वर्षातच पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दयनीय अवस्था झाली. सध्याच्या काळात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांनी पाकिस्तानचा दौरा केलेला. या घटनेनंतर भारतीय चाहत्यांनी बीसीसीआयकडे 2023चा आशिया चषक एका तटस्थ ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे. यावेळी भारतीय चाहत्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा सल्ला देखील दिला.
Sorry, after incident of #ImranKhan
In my opinion Indian cricket team should not to travel Pakistan for #AsiaCup2023Whats your?
— Aniket Anjan 🇮🇳🇮🇳 (@AnjanAniket) November 3, 2022
Imran Khan Shot At Rally In Pakistan, 1 Killed, Many Injured.
Now, Don't Say Anyone That team India Should Go To Pakistan For Asia Cup 2023.
It's END Thank you Pakistan Once again Proving That Pakistan is Nota Safe Place Anymore .#ImranKhan #Pakistan #AsiaCup2023 pic.twitter.com/5htWnBkHoW
— Cricket Apna l Indian cricket l T20WC 🏆 (@cricketapna1) November 3, 2022
आशिया चषक 2023चे आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात येणार होते. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मागच्या महिन्यात भारतीय संघ आशिया चषक 2023 साठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे सांगितले. याआधी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करू शकतो, अशा चर्चांना उधाण आलेले. मात्र, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि विश्वचषक विजेत्या कर्णधारावर पंजाब प्रांतात एका विरोध यात्रेदरम्यान हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आशिया चषक 2023च्या आयोजनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तसेच, केंद्रीय सूचना व प्रसारण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 20 ऑक्टोबरला एक विधान केले. या विधानात त्यांनी म्हटले की, पुढच्या वर्षी होणाऱ्या आशिया चषकात भारतीय संघ खेळणार की, नाही याचा निर्णय गृह मंत्रालय करणार आहे. आता पुढे काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादवची प्रशंसा करताना रोहितने ओलांडली मर्यादा; म्हणाला, ‘त्याच्यामुळेच इतर खेळाडू…’
क्रिकेटर नसता तर सूर्यकुमारने ‘या’ क्षेत्रात कमावले असते नाव, स्वतःच केलेला खुलासा