fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रैनाला कितीही वाटले तरी आता कमबॅक करु शकणार नाही, पहा कोण म्हणतेय हे

September 7, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । काही दिवसांपूर्वी सुरेश रैनाने अचानक आयपीएल आणि चेन्नई सुपर किंग्जला सोडून भारतात परतला. रैनाच्या भारत परत येण्यामागे चेन्नई सुपर किंग्जने व रैनाने कौटुंबिक कारणे दिली.  तथापि, फ्रँचायझीचे मालक एन श्रीनिवासन यांच्या मते, रैना हॉटेलमधील मिळालेल्या खोलीवर नाराज होता.

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू रैनाने, संघात कोरोना पसरल्यानंतर दोन दिवसांनी दुबई सोडली. यानंतर, सीएसकेच्या या उपकर्णधाराने एका मुलाखतीत संकेत दिले की, आपण पुन्हा या संघात सामील होऊ शकतो. त्याचबरोबर संघ मालकाने असेही म्हटले आहे की, रैनाच्या संघात परतण्यावर कर्णधार आणि टीम मॅनेजमेंट निर्णय घेईल.

तथापि, रैनाला आता संघात परत येणे सोपे मानले जात नाही, कारण त्याला यासाठी बीसीसीआयच्या परवानगीची आवश्यकता असेल.  टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयपीएलमधून माघार घेण्यामागील कारणे मंडळाला अद्याप माहिती नाही. रैनाला याबद्दल सांगावे लागेल. जर रैनाच्या कारणांवर बीसीसीआय समाधानी नसेल तर रैनाच्या माघारी परतण्याच्या योजनेवर पुन्हा पाणी फिरू शकते.

चुकल्यास जबाबदार कोण?

सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआयला रैनाच्या भारत परत येण्यामागील कारणे कोणती आहेत याचे मूल्यांकन करावे लागेल. जर हे त्याच्या कुटूंबाबद्दल असेल तर हे त्याचे वैयक्तिक कारण आहे. जर धोनीबरोबर वाद झाला असेल तर ते सीएसकेची अंतर्गत बाब आहे. जर रैना नैराश्यामुळे परतला असेल तर ती मानसिक बाब आहे. जर तो नैराश्यात असेल तर आपण त्याला जाऊ शकत नाही. जर काही चूक झाली तर त्यास जबाबदार कोण असेल? आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने आयपीएलमधून माघार घेत पुनरागमन केले नाही. बोर्ड रैनाला हिरवा कंदिल देतो की नाही हे पाहणे बाकी आहे.


Previous Post

कमनशिबी शिलेदार! आयपीएलमध्ये ९० पेक्षा जास्त धावा करुनही शतकापासून वंचित राहिलेले ७ फलंदाज

Next Post

जोस बटलरच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने असे केले ऑस्ट्रेलियाला पराभूत

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Photo Courtesy; Twitter/@anavin74
Covid19

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/@IPLT20.com
IPL

कृणाल पंड्याच्या ‘सुपर थ्रो’ने आरसीबी चाहत्यांचा रोखला होता श्वास; पाहा डिविलियर्सला धावबाद केलेला तो क्षण

April 10, 2021
Next Post

जोस बटलरच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने असे केले ऑस्ट्रेलियाला पराभूत

फलंदाजाच्या कानाजवळून 'झूप' असा आवाज करत गोलंदाजी करणारे ३ आयपीएल स्टार

आयपीएलमध्ये पर्पल कॅपचे मानकरी ठरलेले ४ भारतीय गोलंदाज

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.