पुणे। एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरतर्फे नुकत्यातच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत एमआयटी महाराष्ट्र अकॉडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ॲन्ड ट्रेनिंग संघाने (मॅनेट) सर्वाधिक पदके जिंकत पहिला क्रमांक पटकावला. एमआयटी इन्स्टीट्यूट ऑफ डिझाईन आणि एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग संघाला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरतर्फे विद्यापीठाच्या मैदानावर विविध प्रकारचे खेळ नुकतेच खेळविण्यात आले. यात बॉस्केटबॉल, क्रिकेट (पुरुष),व्हॉलिबॉल (पुरुष-महिला), टेनिस (पुरुष-महिला), बॅडमिंटन (पुरुष-महिला), बुद्धीबळ (पुरुष-महिला), टेबल टेनिस (पुरुष-महिला), कब्बडी (पुरुष), फुटबॉल (पुरुष), रोईंग (पुरुष-महिला), जलतरण (पुरुष-महिला), क्रॉस कंट्री (पुरुष – महिला) या खेळांचा समावेश होता.
या सर्व खेळ प्रकारात एमआयटी मॅनेट संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. या संघाने एकूण १२ सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. यात बॉस्केटबॉल, क्रिकेट (पुरुष), व्हॉलिबॉल (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष), टेबल टेनिस (पुरुष), कब्बडी (पुरुष), फुटबॉल (पुरुष), रोईंग (पुरुष-महिला), जलतरण (पुरुष), क्रॉस कंट्री (पुरुष – महिला) प्रकारात सुवर्ण, तर बुद्धीबळ (पुरुष) प्रकारात रौप्य पदक जिंकले.
एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग संघाने बुद्धीबळमध्ये सुवर्ण, तर बास्केटबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस (पुरुष), कब्बडी (पुरुष), फुटबॉल (पुरुष), रोईंग (पुरुष ), क्रॉस कंट्री (पुरुष) प्रकारात रौप्य पदक जिंकले. एमआयटी इन्स्टीट्यूट ऑफ डिझाईन संघाने टेनिस (पुरुष), बॅडमिंटन (महिला) आणि जलतरण (महिला) प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. बॅडमिंटन (पुरुष), जलतरण (पुरुष) प्रकारात रौप्य पदक जिंकले.
एमआयटी कॉलेज ऑफ फुड अन्ड टेक्नॉलॉजी संघाने बुद्धीबळ (महिला) प्रकारात सुवर्ण, तर व्हॉलीबॉल (पुरुष), रोईंग (महिला) संघाने रौप्य पदक जिंकले. एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्ट संघाने जलतरण (महिला) प्रकारात रौप्य, एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने बुद्धीबळ (महिला) संघाने रौप्य, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंग संघाने टेनिस (पुरुष) व बॅडमिंटन (महिला) संघाने रौप्य पदक जिंकले.