fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वॉर्नरच्या हैदराबादला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू पडला आयपीएल बाहेर

Mitchell Marsh Ruled Out Of IPL Due To Ankel Injury

September 23, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0

इंडियन प्रीमियर लीग २०२०ची सुरुवात होऊन ४ दिवस झाले नाहीत, तोपर्यंत कित्येक खेळाडूंना दुखापती होत आहेत. सर्वप्रथम आयपीएलच्या दूसऱ्या सामन्यात आर अश्विनला दुखापत झाली होती. तर सोमवारी पार पडलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात सनराइझर्स हैद्राबाद संघाचे मिशेल मार्श आणि राशिद खान या २ खेळाडूंनाही दुखापत झाली होती.

अशात मार्शची दुखापत गंभीर असल्यामुळे तो पूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात होते. पण या गोष्टीची कसलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र आता सनराइझर्स हैद्राबाद संघाने राशिद आणि मार्श यांच्या दुखापतींविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, राशिदची दुखापत बरी झाल्यामुळे तो पुन्हा मैदानावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. तर मार्शच्या बाबतीत वाईट बातमी समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्शच्या घोट्याला झालेली दुखापत जास्त गंभीर असल्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे राजस्थान संघाच्या इथून पुढील सामन्यात तो खेळताना दिसणार नाही. Mitchell Marsh Ruled Out Of IPL Due To Ankel Injury

सोमवारी (२१ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना मार्शला ही दुखापत झाली होती. तो बेंगलोरच्या डावातील ५वे षटक टाकण्यासाठी आला होता. परंतु, षटकातील चौथ्या चेंडूवर बेंगलोरचा फलंदाज देवदत्त पड्डीकलचा चेंडू अडवताना त्याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे तो डावातून बाहेर पडला होता.

मार्शच्या जागी हैद्राबादमध्ये वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डरला स्थान देण्यात आले आहे. हैद्राबाद संघाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन या गोष्टीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “दुखापतीमुळे मार्श आयपीएलमधून बाहेर पडला आहे. तो लवकर बरा व्हावा याची आम्ही प्रार्थना करतो. ड्रीम ११ आयपीएल २०२०मध्ये मार्शच्या जागी जेसन होल्डर खेळताना दिसेल.”

अष्टपैलू खेळाडू होल्डरने आतापर्यंत ११ आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३८ धावा आणि ५ विकेट्स चटकावल्या होत्या. त्याच्या या प्रदर्शनाला पाहता २०१६ नंतर त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या –

१३ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजाने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा

जे धोनीला जमलं नाही, ते संजू सॅमसनने करुन दाखवलं

पाहा तर स्मिथ काय म्हणतोय, धोनी- फाफने शेवटच्या षटकात चांगले शॉट्स ठोकले, पण…

ट्रेंडिंग लेख –

चेन्नई-राजस्थान सामन्यात बनले मोठे विक्रम, संजू सॅमसनच्या नावावर झाली ‘एवढ्या’ विक्रमांची नोंद

दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम

मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी 


Previous Post

हॉटस्पॉट आणि स्निकोमीटर; नक्की भानगड आहे तरी काय भाऊ?

Next Post

अच्छा! तर हा आहे चेन्नईविरुद्ध सामनावीर ठरलेल्या सॅमसनच्या यशाचे गमक

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

व्हिडिओ : क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा ते विजयानंतरचा जल्लोष, ऑस्ट्रेलियन कॅमेरामनने टिपलेले खास क्षण

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

अच्छा! तर हा आहे चेन्नईविरुद्ध सामनावीर ठरलेल्या सॅमसनच्या यशाचे गमक

Photo Courtesy: www.iplt20.com

फक्त ९० धावा आणि मुंबईचा कर्णधार रोहित घालणार 'या' शानदार विक्रमाला गवसणी

Photo Courtesy: www.iplt20.com

लिलावात २ करोड मिळालेला क्रिकेटर आयपीएलमधून बाहेर

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.