ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीच्या चौथ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) संघ आमने- सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली (Virat Kohli) ठरला. या थरारक सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा प्रमुख अष्टपैलू मिचेल मार्श ((Mitchell Marsh) याने थेट विश्वचषक थांबवण्याची मागणी केली आहे.
भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या थरारानंतर अजूनही त्याच सामन्याची चर्चा सगळीकडे होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यापूर्वी मार्श पत्रकारांना सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत त्याला भारत पाकिस्तान सामन्याविषयी विचारले असता तो म्हणाला,
“मला विचारलं तर आता विश्वचषक थांबवला गेला पाहिजे. अशा सामन्यानंतर तुम्हाला आणखी काय हवं असतं? भारत पाकिस्तान सामन्यासाठी मी प्रेक्षकांत असण्याची कल्पना देखील करू शकत नाही.”
या सामन्यात अद्वितीय खेळी करणाऱ्या विराट कोहली याचे देखील त्याने तोंड भरून कौतुक केले. तो म्हणाला,
“विराटने पुन्हा एकदा त्याचा दर्जा सिद्ध केला. ती एक अविश्वसनीय खेळी होती. आपण त्याची कारकीर्द पाहिली तर, आपल्याला हे दिसून येते. मागील काही दिवसांपासून तो फॉर्ममध्ये नव्हता. मात्र, विश्वचषकासारख्या मंचावर आल्यावर त्याने आपले खरे रूप दाखवून दिले.”
विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आल्यानंतर सातव्या षटकापर्यंत भारताने चार गडी गमावले. त्यानंतर त्याने अष्टपैलू हार्दिक पंड्यासह 103 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत 53 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. विराटला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याला जास्त वेळ शांत ठेवणे म्हणजे…’, वाचा विराटविषयी ब्रेट ली काय म्हणाला
विराटची ऑस्ट्रेलियात विक्रमांची माळ! ‘हा’ पराक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार