fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ब्रेकिंग: दुखापतीमुळे आयपीएल २०१८मधून मोठा खेळाडू बाहेर, केकेआरला जोरदार धक्का

आयपीएल २०१८ मधून मिचेल स्टार्क बाहेर पडला आहे. दुखापतीमूळे हा खेळाडू बाहेर पडला आहे. याबरोबर तो आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या कसोटी सामन्यालाही मुकला आहे. 

उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमूळे त्याला चौथ्या कसोटी सामना तसेच आयपीएल २०१८मधून माघार घ्यावी लागत आहे. 

स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्स संघाने तब्बल ९.४ कोटी रुपये देऊन संघात घेतले होते. सध्या जबरदस्त फाॅर्ममध्ये असलेल्या स्टार्कच्या दुखापतीमूळे बाहेर जाण्यामुळे  कोलकाता नाईट रायडर्सला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

यापुर्वीच ख्रिस लीन आणि आंद्रे रस्सेल हे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. 

स्टार्क मालिका संपल्यावर मायदेशी परतेल तसेच तो आयपीएलमध्ये भाग घेणार नसल्याचे क्रिकेट आॅस्ट्रेलियाने ट्विटरवर कळवले आहे. 

स्टार्कने सध्या सुरु असलेल्या मालिकेत ३ कसोटी सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत तर २७ आयपीएल सामन्यात ३४ विकेट्स घेत चांगली कामगिरी केली आहे. 

You might also like